<
वरणगाव – (प्रतिनिधी) – भाजपा सरकारच्या काळात वरणगाव शहरासाठी 24 बाय 7 अशी 25 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करून दिली मात्र आज 2 वर्ष होत आहे तरी योजनेच्या कामाला जलद गतीने सुरवात होत नसल्याने वरणगावकरांना 10 दिवसाआड़ पिण्याचे पाणी मिळत असल्याने पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहे.
त्याकरिता संपूर्ण वरणगाव शहारा तील पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे यासाठी मंजूर पाणी पुरवठा योजना सुरू होणे अत्यांत महत्वाचा प्रश्न आहे त्याकरिता पाणी पुरवठा नियमीत पाणी मिळाले पाहिजे व भाजपा सरकारच्या काळात मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम जलद गतीने सुरू यामागणी साठी भाजपा महिला आघाडीच्या वतीने महिला उद्या शुक्रवारी दि 18 जून रोजी सकाळी 10 वाजे पासून नगरपरिषद मध्ये उपोषण करण्यात येणार आहे.
निवेदनाच्या प्रति विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस माजी मंत्री गिरिषभाऊ महाजन खासदार रक्षाताई खडसे माजी कृषिमंत्री आमदार संजयजी सावकारे जिल्हाधिकारी जळगाव प्रशासक व मुख्यधिकारी यांना पाठविल्या आहेत पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन अधिक त्रिव करणार असल्याचा इशारा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सौ प्रणिता पाटील चौधरी कार्यध्यक्ष जयश्री अवतारे सरचिटणीस सौ भाग्यश्री पाटील सौ वर्षा बढे उपाध्यक्षा कस्तुराबाई इंगळे मंदाताई थटार फरीदाबी शेख नासिर सौ गणेकर चिटणीस सौ संगीताताई माळी सौ मीराताई चौहान मोनबी शेख उत्साफ सौ सुजाता वंजारी मीनाक्षी पालवे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.