<
वरणगाव – (प्रतिनिधी) – वरणगाव शहरासाठी तत्कालीन मुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस जलसंपदा मंत्री गिरिषभाऊ महाजन खा रक्षाताई खडसे माजी कृषिमंत्री आ संजयजी सावकारे यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष सुनील काळे यांनी 24 बाय 7 अशी 25 कोटी ची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली.
मात्र महाविकास आघाडीने स्थगिती दिली व अडथळे निर्माण केल्यान दोन वर्षे झाले आद्यपपर्यंत योजनेचे काम जलद गतीने सुरू झाले नसल्याने आज वरणगाव शहरात 10 ते 12 दिवसा आड पाणी येत असल्याने प्रचंड हाल पाण्या साठी होत आहे. मंजुर पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाले पाहिजे आणि पाणी नियमीत वेळेवर शुद्ध मिळाले पाहिजे यासाठी आज आज शुक्रवारी वरणगाव नगरपरिषद समोर महिला आघाडीच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले.
महाविकास आघाडीचा धिक्कार असो
पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे
वरणगाव करांच्या तोंडाचे पाणी लांबविण्याचे पाप करणाऱ्या विकास विरोधी आघाडीचा सत्यानाश व्होवो. अश्या घोषणा देण्यात आल्या.
मंजूर पाणी पुरवठा योजनेचे जलद गतीने काम सुरू न केल्यास आंदोलन अधिक त्रिव करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांना फोन करून संपूर्ण माहिती देण्यात आली ना देवेंद्रजी फडणवीस यांनी या विषयी पाणी योजनेचे काम सुरू करण्यासाठी भाग पाडतो असे सांगितले.
यावेळी महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सौ प्रणिता पाटील चौधरी माजी नगरसेविका सौ माला ताई मेढे माजी ग्राप सदस्य रुख्मिनी काळे कस्तुराबाई इंगळे कमल बाई पाटील रजनी भावसार कमलबाई मोरे गंगूबाई माळी अलका धनगर अनिता चांदणे भाग्याश्री पाटील वर्षा बढे जयश्री अवतारे मंदा थटार मीनाक्षी पालवे अर्चना माळी उषा पवार दुर्गाबाई तायडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे जेष्ठ नेते हाजी अल्लीद्दीन सेठ शहराध्यक्ष सुनील माळी संजय कुमार जैन अजय पाटील तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर गोलू राणे हितेश चौधरी माजी सरपंच सुभाष धनगर कृष्णा माळी संदीप माळी दत्तू मराठे मनोहर सराफ के ले अंभोरे डॉ प्रविन चांदणे डॉ सादिक जावेद शाहा फहिम शेख डी के खाटीक रमेश पालवे मिलिंद भैसे पप्पू ठाकरे जयेश कपाटे रॉक कश्यप दीपक चौधरी किरण वंजारी राहुल जंजाळे तेजस जैन लखन माळी नत्थु पवार गंभीर माळी नाना सुरळकर यांच्यासह असंख्य महिला व नागरिक उपस्तीत होते.