<
जळगाव – (प्रतिनिधी) – एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून डॉ. आरती गोरे मॅडम हे लाभले होते. यावेळी प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, डॉ. डी. आर. क्षीरसागर, रसेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. रेखा पहुजा, प्रा. जी.व्ही. धुमाळे, डॉ. विजेता सिंग, डॉ. योगेश महाजन, डॉ. अंजली बोंदर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. गोरे यांनी कोरोणा सारख्या आपत्तीच्या काळात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून योगाचे महत्व आधोरेखित करून विविध आसणाचे प्रकार व त्याचे लाभ याचे विश्लेषण करत प्रात्यक्षिकांह मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी प्राचार्य डॉ. रेड्डी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमूख पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. सिंग यांनी वक्त्यांचे परिचय करून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पाहुजा यांनी केले. शेवटी डॉ. महाजन यांनी मान्यवरांचे आभार मानले.