धरणगाव – (प्रतिनिधी) – तालुका धरणगाव येथील पत्रकार दीपक श्रीखंडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, च्या धरणगाव तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
अजिंठा विश्रामगृह जळगांव येथे बैठक झाली त्यावेळी उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले. बैठकीला जळगाव महानगराध्यक्ष कमलेश देवरे ,जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष दीपक सपकाळे ,जिल्हा संघटक भगवान मराठे विभागीय उपाध्यक्ष भूषण महाजन धरणगाव तालुका अध्यक्ष गोपाळ सोनवणे व इतर पत्रकार उपस्थित होते.