<
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 24 – राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली (National Scheduled Castes and Development Corporation) यांच्यामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी Support for Marginalized Individuats for Livelihoods and Enterprise (SMILE) ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. कोविड -19 या महामारीमुळे ज्या कुटूंबातील प्रमुख व्यक्ती (Breadearner) मृत्यू पावली आहे, अशा कुटूंबातील प्रमुख वारसदारास एन. एस.एफ.डी. सी, नवी दिल्ली यांचेमार्फत रु. 5 लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे.
वारसदारास एन.एस.एफ.डी.सी मार्फत 1 लाख रुपये भांडवली अनुदान मिळणार असून 4 लाख रुपये कर्ज 6 टक्के व्याजदराने देण्याचे विचाराधीन आहेत.
अर्जदाराने मयत व्यक्तीचे नाव, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, जात/पोटजात, मृत्यूचा दिनांक, रेशनकार्ड, मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, कुटूंबातील व्यक्तींची एकूण संख्या, कुटूंबातील प्रमुख वारसदार, कुटूंबातील व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न (रु. 3 लाखाच्या आत) पाठवावे.
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या कुटूंबातील व्यक्तीने उपरोक्त माहिती संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी, अथवा https://forms.gle/Q४८५fSUQYEuL४xUx७ या लिंकवर पाठविण्यात यावी. असे एस. एल. तडवी, जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.