<
जामनेर – (प्रतिनिधी) – आज तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जामनेर येथे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय सोनवणे यांनी भेट दिली व कोरोना टेस्टिंग, कोरोना लसीकरण,क्षयरोग, कुष्ठरोग, नियमित लसीकरण, प्रसुती पश्चात सेवा,व सहा राष्ट्रीय कार्यक्रम , आढावा घेण्यात आला.डॉ.सोनवणे यांनी अधिकारी व कर्मचारी यांना कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच जुलै अखेर येणाऱ्या तिसऱ्या लाटेत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर किमान 8 ते 10 ऑक्सिजन बेड ग्रामपंचायतीच्या च्या माध्यमातून व दानशूर दात्यांकडून करण्यात येणार आल्याचे त्यांनी सांगितले तसेच लवकरच नॉन कोव्हिडं सेवा विशेषतः कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कॅम्प सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रसंगी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय सोनवणे यांचा तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून व मलेरिया सोयाईटी,कर्मचारी संघटना यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे,वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम,डॉ.मनोज पाटील,डॉ.नरेश पाटील,डॉ.जितेंद्र जाधव,डॉ.किरण पाटील,डॉ. अमृता कोलते,डॉ.पुरुषोत्तम पाटील,तालुका आरोग्य सहाय्यक बशीर पिंजारी, तालुका मलेरिया सुपरवायझर व्ही.एच.माळी, मिलिंद लोणारी,सर्व आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यीका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक उपस्तीत होते.