Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळके विद्युत उपकेंद्र येथे अधिकारी व कर्मचारी यांचा गलथान कारभार चव्हाट्यावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
जळके विद्युत उपकेंद्र येथे अधिकारी व कर्मचारी यांचा गलथान कारभार चव्हाट्यावर


जळके-(प्रतिनिधी) – :ता.जि.जळगांव येथील विद्युत उपकेंद्र हद्दीत समाविष्ट असलेल्या गावांमध्ये एमएसईबी च्या कर्मचार्यांमार्फत सध्या ग्रामपंचायतींकडे वसुलीसाठी तगादा लावला जात आहे.

यासाठी संपर्कासाठी या विद्युत उपकेंद्राला प्रभारी असलेल्या कनिष्ठ अभियंता मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांचे फोन कॉल घेत नाहीत,तसेच संबंधित विभागातील कर्मचारी यांना गावांमधील जुन्या पाणीपुरवठा विद्युत जोडणीविषयी परिपूर्ण माहिती नसल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे म्हणने आहे.

बहुतेक गावांमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विद्युत जोडणी संदर्भात विविध तक्रारी आहेत, त्यात प्रामुख्याने बऱ्याच वर्षांपासून बंद अवस्थेत(म्हणजेच वापर नसलेले)विद्युत बिल आकारणी केली जात आहे.त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतीकडे विज वितरण कंपनीची थकबाकी दिसते,त्यासंदर्भात जळके विद्युत उपकेंद्र परिसरातील जळके,वसंतवाडी,विटनेर,वावडदा,लोणवाडी,सुभाषवाडी, झोपडितांडा व वराड येथील ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांचे शिष्टमंडळ आज रोजी नागरिकांसोबत जळके विद्युत उपकेंद्र येथे संबंधित कनिष्ठ अभियंता यांना भेटण्यासाठी सकाळी १० वाजेपासून ते दुपारी १२:१५ पर्यंत ताटकळत जळके उपकेंद्रात बसलेले होते.यासंदर्भात अभियंत्यांना विचारले असता माझ्याकडे अतिरिक्त पदभार आहे,मी आपल्याला माझ्या उपस्थितीची वार व वेळ सांगू शकत नाही.

माझ्या सोयीनुसार मी येथील कार्यभार सांभाळेल असे उत्तर संबंधित शिष्टमंडळाला देण्यात आले संबंधित विद्युत उपकेंद्रात कार्यरत असलेले कर्मचारी नेमणुकीच्या गावात फक्त वसुली कामी हजर राहत असल्याचे चित्र आहे. विजेसंबंधी येणाऱ्या समस्यांसाठी या विद्युत उपकेंद्रात संपर्कासाठी कोणताही कार्यालयीन नंबर नाही तसेच संध्याकाळी ५ वाजेनंतर या विद्युत उपकेंद्राच्या गावांमध्ये विजेसंबंधी अडचण आल्यास स्थानिक कोणताही कर्मचारी नाही त्यामुळे मोठा विद्युत अपघात झाल्यास होणाऱ्या जीवित हानिस किंवा नैसर्गिक आपत्तीस कोण जबाबदार राहणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करतांना दिसून येत आहेत. त्यासाठी वरिष्ठांनी वेळीच लक्ष घालून हा भोंगळ कारभार थांबवावा अन्यथा येत्या काही दिवसात वीज कंपनीच्या विरोधात मोठे आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


तसेच कनिष्ठ अभियंता यांच्यापाठीमागे एका राजकीय आमदाराचा वरदहस्त असल्याचे नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे म्हणून अभियंता जिथे पदभार आहे तिथे आणि जिथे अतिरिक्त पदभार आहे तिथे दोघे ठिकाणी उपस्थित राहत नाही की काय? असा प्रश्न सध्या नागरिकांच्या मनात घर करून बसला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन बेड तयार करणार;प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय सोनवणे

Next Post

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑलिंपिक दिन साजरा

Next Post

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑलिंपिक दिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo