<
बोदवड :- (अमित जैन ) महा विकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेसर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजावर अन्याय झाल्याची भावना भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करीत बोदवडला तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
शनिवारी सकाळी मलकापूर चौफुलीवर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनस्थळी भाजपा तालुका सरचिटणीस अमोल देशमुख यांनी आंदोलनाची भूमिका सांगितली.
आंदोलन यशस्वितेसाठी अनंतराव कुलकर्णी, तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका सरचिटणीस अमोल देशमुख, राजेंद्र डापसे, शहराध्यक्ष नरेश आहुजा, डॉक्टर ब्रिजलाल जैन, चरण सिंग पाटील, दिलीप घुले, भागवत चौधरी, धनराज सुतार, वैभव माटे, संजय अग्रवाल, संतोष चौधरी, भूषण देशमुख, सचिन जैस्वाल, नीलेश देशमुख, राम आहुजा, शरद माटे, रोहित अग्रवाल, अशोक झाबक, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम वरकड, विक्रम सिंग पाटील संजय बडगुजर पंकज चांदुरकर उमेश गुरव मयुरेश शर्मा प्रदीप डुंगरवाल, बलराम आहुजा, महेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.