<
जळगाव – (प्रतिनिधी) – एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रास प्रमूख वक्ते म्हणून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. प्रकाश पवार आणि औरंगाबाद येथील एम.पी. लॉ कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. श्रिकिषण मोरे हे लाभले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांनी भूषविले. यावेळी डॉ. डी.आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पाहूजा, प्रा. जी. व्ही. धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. विजेता सिंग, ग्रंथपाल अमिता वराडे उपस्थित होते. चर्चासत्रात राज्यभरातील प्राध्यापक, संशोधक, वकील आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कर्यांचा दाखला देत शाहू महाराज यांचे सामाजिक न्यायातील योगदान जॉन रॉल्स च्या न्याय संकल्पनेच्या पुढे जाणारे असल्याचे अधोरेखित केले. त्यानंतर प्रा. मोरे यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जोडणारा दुवा शाहू महाराज असल्याचे स्पष्ट करून त्यांच्या शैक्षणिक योगदानाचे विवेचन केले. तत्पूर्वी डॉ. क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली, डॉ. सिंग यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला तर डॉ. रेड्डी यांनी प्रास्ताविक व वक्त्यांचे स्वागत करून अध्यक्षीय मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धुमाळे यांनी केले व शेवटी मान्यवरांचे आभार मानले.