<
जळगाव – (प्रतिनिधी) – एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात बौद्धिक धनसंपदा अधिकार (आयपिआर) या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
चर्चासत्रास प्रमूख वक्ते म्हणून दिल्ली येथील येथील दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटर चे प्रा. डॉ. रमण मित्तल आणि पुणे पोलिस विभागातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री दिपक लगड हे लाभले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांनी भूषविले. यावेळी डॉ. डी.आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पाहूजा, प्रा. जी. व्ही. धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. विजेता सिंग, ग्रंथपाल अमिता वराडे उपस्थित होते. चर्चासत्रात देशभरातील प्राध्यापक, संशोधक, वकील आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मित्तल यांनी समाज, कायदा आणि धनसंपदा यांचा परस्पर संबंध अधोरेखित करून बौद्धिक धन संपदा चे विविध पैलू स्पष्ट केले. त्यानंतर श्री लगड यांनी सायबर क्राइम संदर्भात मार्गदर्शन करताना सामाजिक माध्यमातून होणारे गुन्हे आणी फसवणूक संदर्भात विविध उदाहरणासह मार्गदर्शन केले. तत्पूर्वी प्राचार्य डॉ रेड्डी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, मान्यवरांचे स्वागत करून अध्यक्षीय मार्गदर्शन केले. डॉ. क्षीरसागर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. डॉ. विजेता सिंग यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला व सूत्रसंचालन केले. शेवटी प्रा. धुमाळे यांनी मान्यवरांचे आभार मानले.