<
जळगाव – (प्रतिनिधी) – एक जुलै हा संपूर्ण जगात डॉक्टर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो आज जळगाव जिल्हा मनियार बिरादरी ने डॉक्टर डे च्या निमित्ताने जळगाव शहरातील डॉक्टर जे कोरोना काळापासून आजतागायत वैद्यकीय सेवा ही सामाजिक बांधिलकीच्या अधीन राहून करत आहे अशा डॉक्टरांचा प्रातिनिधिक स्वरूपात स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या डॉक्टरांचे केले कौतुक
यात प्रामुख्याने कोविड च्या पहिल्या रुग्णापासून आजपर्यंत हजारो रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर सुयोग चौधरी, त्याप्रमाणे या महामारी च्या काळात डोळ्यांची काळजी घेणारे व चार जिल्ह्यातील एकमेव रेटिना सर्जन डॉक्टर निलेश चौधरी, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्जन असून सुद्धा कोविड रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर मिलिंद चौधरी व जळगाव शहरात नॉन कोविड व कोविड या दोन्ही रुग्णा साठी अहोरात्र सेवा सेवा देणारे डॉक्टर मंदार पंडित व सर्वात महत्वाचे म्हणजे या महामारी च्या काळात आपले पूर्ण १४० खाटांचे हॉस्पिटल कोविड रुग्णांना समर्पित करणारे सारा हॉस्पिटल चे मॅनेजिंग डायरेक्टर मिनाझ पटेल व सर्वात महत्वाचे म्हणजे बी यु एम एस असून सुद्धा रुग्णांची सेवा करून डॉक्टरांना सहकार्य करणारे डॉक्टर जावेद शेख यांचा गौरव करण्यात आला.
यांनी केला गौरव
जिल्हा मानियार बिरादरीचे तथा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष फारुक शेख, शहर अध्यक्ष सय्यद चाँद अमीर, जिल्हा बिरादरीचे संचालक सलीम मोहम्मद, युवा मानियार बिरादरीचे मोहसिन युसुफ ,अख्तर शेख, व मुजाहिद खान आदींनी सन्मानित केले.
असाही योगा योग
◆ एक जुलै हा डॉक्टर डे असला तरी डॉक्टर मंदार पंडित यांचा १ जुलै वाढदिवस असल्याने त्यांचे विशेष असा गौरव बिरादरी तर्फे करण्यात येऊन त्यांना शाल ,श्रीफळ बुके सह स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले,
◆ फारूक शेख यांनी आजच्या दिवसाचे औचित्य साधून आपल्या दुसऱ्या डोळ्याचे ऑपरेशन डॉ निलेश चौधरी कडे केले.