<
मुंबई, दि. 6 : “धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी करणे” या संदर्भातील तदर्थ संयुक्त समितीच्या नामाभिधानात सुधारणा करून “धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी समिती” असे समितीचे नामाभिधान करण्यात येऊन विधिमंडळाची ही कायमस्वरुपी समिती असावी असा प्रस्ताव आज विधानपरिषदेत संमत करण्यात आला.
विधी व न्याय राज्यमंत्री तथा समिती प्रमुख कु.आदिती तटकरे यांनी हा प्रस्ताव मांडला होता.