<
जळगाव – इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा जळगावच्या वतीने आज शासकीय महिला (कोविड) हॉस्पिटल, मोहाडी येथे मा. जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस व अध्यक्ष श्री. अभिजित राऊत (भा.प्र.से.) यांचे शुभहस्ते “ऑक्सिजन बँक” या नवीन उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधिक्षक मा. डॉ. प्रविण मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. निकुंभ, शासकीय महिला रुग्णालय मोहाडी येथी व्यवस्थापक डॉ. तासखेडकर, डॉ. विलास मालकर, डॉ. सतीश सुरळकर, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सहसचिव राजेश यावलकर, कार्यकारिणी सदस्य अनिल शिरसाळे, डॉ, अपर्णा मकासरे, सौ. पुष्पाताई भंडारी इ. मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपाध्यक्ष गनी मेमन यांनी सांगितले कि कोविड काळात ऑक्सिजन तुटवडा होत असल्याचे लक्षात येताच माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार त्वरित ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर बसविण्यात आले. रेडक्रॉसमार्फत चालीस लाख रुपये खर्च करून संपूर्ण तालुक्यात लावलेल्या या ड्युरा सिलेंडरमुळे जळगाव जिल्ह्यात कुठे हि ऑक्सिजन अभावी कोणतीही अप्रिय घटन घडली नाही याचे आंतरिक समाधान आहे. भविष्यातहि पुन्हा ऑक्सिजनची गरज पडल्यास कुणाला अडचण निर्माण होऊ नये म्हणून “ऑक्सिजन बँक” या संकल्पनेला सुरुवात करण्यात आली आहे. रेडक्रॉस रक्तकेंद्राचे चेयरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी रक्तकेंद्रामार्फत देण्यात येत असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानानाबद्दल व प्लाझमा दानाबद्दल माहिती दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी हि रेडक्रॉसच्या कार्याचे कौतुक करत रक्तपेढी पुरते मर्यादित न राहता सर्वच स्तरावरील केलेल्या कार्याची प्रशंसा केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी हि रेडक्रॉसच्या सर्व स्तरावरील कार्यावरील कामाची माहिती असून या पुढे ही माझ्या परीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मा. जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस व अध्यक्ष श्री.अभिजित राऊत यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, सर्वच सामाजिक संस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे व जळगावकर नागरिकांनी ठेवलेल्या विश्वासामुळे कोरोना संसार्गावर मात करू शकलो. यासाठी मी सर्व कोरोना योध्ध्यांचा व माझ्या सर्व सहकार्यांचा आभारी आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व एकत्र काम करत राहू अशी शास्वती त्यांनी दिली. रेडक्रॉसचे मानद सचिव विनोद बियाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले तर सूत्र संचालन रेडक्रॉसच्या जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा यांनी केले.