<
महाजनादेश यात्रे निमित्त मुख्यमंत्री दौरा नियोजनाचे कारण देऊन जनसेवेत खंड
जळगांव(धर्मेश पालवे):-गेल्या निवडणुकीत महाराष्ट्रात भरगोस मताधिक्याने भाजपा सरकार आपल्या डोक्यावर एक तुरा लावण्यास समर्थ ठरली,त्याच बरोबर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात ही बदल झाले ,मोदी सरकार अथवा फडणवीस सरकार मोठं मोठया आव्हानांना समोर ठेवत जनतेच्या भावनांशी खेळी खेळत आल्याचं ही आपण पाहत आलो. लोकसंपर्क, जनसंवाद, आणि मतवाढी आणि कार्यकर्ता वाढीसाठी गेल्या महिन्या भरात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या जळगांव दौऱ्याच्या नियोजनाची तयारी सुरू आहे, काही अडचणी मुळे हा दौरा रद्द ही झाला होता. येत्या२३ऑगस्ट रोजी हा दौरा शब्दपूर्तीस उतरणार आहे, त्या निमित्ताने आज दि २२ रोजी शहरात दौऱ्याच्या तयारीला जळगांव जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, व इतर प्रमुख प्रशासन जीव तोडून कामाला लागले आहेत. मात्र या दौऱ्याच्या आड आपलं कर्तव्य व जनसेवेत येथील कर्मचारी व प्रशासन कचुराई करत असल्याचं चित्र समोर आले आहे.शहरातील मुख्य हायवे क्र ६ वर, व शहरातील मुख्य आकाशवाणी चौक येथे रस्त्यावरील वाहने, अवजड वाहन,दुचाकी व चारचाकी गाड्या वाहतूक नियम धाब्यावर ठेवत मिळेल तो त्या बाजुंनी प्रवास करत आहे, रस्ते पोलीस या चौकात नसून वाहनांच्या गर्दीत लोक अडकल्याच दिसल आहे. एवढंच काय रस्त्यावरील पोलीस प्रशासनाचे बेरिकेट ही पोलीस नियंत्रणाच्या थांब्यावर सोडलेले दिसून आले आहे. सकाळी ठीक ११ वाजता हा रस्ता भरधाव धावणाऱ्या, अवजड वाहन घेऊन जाणार्या व लोकांच्या रहदारीने व्यापून जातो, मात्र आज मुख्यमंत्री साहेबांच्या दौऱ्या साठी वाहतूक नियम, नियंत्रण व व्यवस्थापन याकडे शहरातील पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचं, आणि महाजनादेश दौऱ्या साठी च कारण सांगत आपलं कर्तव्य पार पडतानाच कामचुकारपणा करत आहेत हे दिसून आले आहे.