Tuesday, September 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती राष्ट्रीय पातळीवर साजरी व्हावी- महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
संत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती राष्ट्रीय पातळीवर साजरी व्हावी- महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर

मुंबई, दि. ८ : थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा  यांची १५० वी जयंती राज्यात शासकीय यंत्रणेमार्फत साजरी व्हावी, तसेच राष्ट्रीय पातळीवरही साजरी व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे श्री गाडगेबाबा मिशनच्या अध्यक्ष तथा महिला व बालविकास मंत्री  यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

मंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतेच श्री गाडगेबाबा  मिशन मुंबईच्या अध्यक्षपदाची सुत्र हाती घेतली आहेत. अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर मंत्री महोदयांनी मिशनच्या कार्यकारिणी सभेला  उपस्थिती लावली. यावेळी त्या बोलत होत्या.

संत गाडगेबाबा  यांची २०२६ मध्ये येणारी १५०वी जयंती राष्ट्रीय पातळीवर साजरी व्हावी यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, तसेच राज्यात शासकीय यंत्रणेमार्फत जयंती साजरी करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा आपण करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.

संत गाडगेबाबांची तत्वे तसेच विचार सर्वत्र पोहोचविण्यासाठी सदैव तत्पर असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.   संत गाडगेबाबा  यांचे विचार समाजात सर्वत्र पोहोचवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. अत्यंत साध्या पद्धतीने राहणाऱ्या संत गाडगेबाबा  यांनी आपल्या कृतीमधून समाजसेवा काय असते, वैज्ञानिक दृष्टीकोन काय असतो, अंधश्रद्धेने कसे नुकसान होते याबाबत जीवनभर जनजागृती केली.  संत गाडगेबाबा  यांनी केलेल्या कार्यामधून प्रेरणा घेऊन आपण सगळ्यांनीच त्यांचे विचार आत्मसात करणे आणि ते इतरांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही मंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले.

संत गाडगेबाबा  मिशन मुंबईच्या नवी मुंबईतील वाशी येथील प्रशासकीय कार्यालयात ही सभा पार पडली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा संपन्न

Next Post

‘पवित्र’ प्रणालीच्या (PAVITRA) माध्यमातून सुमारे सहा हजार पदे भरण्याची प्रक्रिया राबविणार

Next Post
‘पवित्र’ प्रणालीच्या (PAVITRA) माध्यमातून सुमारे सहा हजार पदे भरण्याची प्रक्रिया राबविणार

‘पवित्र’ प्रणालीच्या (PAVITRA) माध्यमातून सुमारे सहा हजार पदे भरण्याची प्रक्रिया राबविणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo