रावेर ता.प्रतिनिधी-विनोद कोळी
निंभोरा बु. येथील तरुण शेतकरी दिपक पद्माकर पाटील यांचे मागील वर्षी निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबास आ.शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा चेक मयत शेतकरी दिपक पाटील यांच्या पत्नी प्रणिता दीपक पाटील यांना देण्यात आला.
यावेळी आ.शिरीष चौधरी यांच्यासोबत रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे,मंडळाधिकारी सचिन पाटील हे होते. तसेच ग्रा. पं. सदस्य शेख दिलशाद, ग्रामस्थ मंडळीत नितीन पाटील, हेमंत चौधरी,किरण कोंडे,संदीप महाले,रितेश महाले,जितेंद्र सोनवणे,पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते.
मयत शेतकरी दिपक पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण व्हावे यासाठी शासनातर्फे ही मदत देण्यात आली असून अशा दुर्दैवी स्थितीत कुटुंबाला सावरून संसाराचा गाडा चालविण्यासाठी धीर देण्याचे काम शासनातर्फे होत असल्याची भावना आ. शिरीष चौधरी यांनी यावेळी व्यक्त केली.