<
जळगाव – जिल्हा नगररचना सहाय्यक संचालक या पदावर श्री. आर. एम. पाटिल यांची नुकतीच नियक्ती / नेमणुक करण्यात आलेली आहे. यापूर्वी काही वर्षांपूर्वी श्री. आर. एम. पाटिल हे जळगाव येथे नगररचनाकार पदावर कार्यरत असतांना त्यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरलेली होती.
नागरिकांशी तुसडेपणाने वागणे , अत्यंत भ्रष्ट हेतूने प्रकरणांमध्ये त्रुटी काढणे , कामात टाळाटाळ व दिरंगाई करणे अशा प्रकारच्या तक्रारी त्यांच्या विरुद्ध होत्या . तसेच यापूर्वी असलेल्या नियुक्तीच्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या विषयी गंभीर आरोप झालेले असुन चौकशी सुरू आहे .
तरीही अशा परिस्थितीत त्यांना जळगाव जिल्ह्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे असे निवेदनात म्हटले आहे.
इतकेच नव्हे तर त्यांना जळगाव महानगरपालिका नगररचनाकार या पदाचा देखील चार्ज देण्यात आलेला आहे . पदाधिकाऱ्यांकडुन वारंवार नगरविकास विभागास या बाबींची जाणीव करून दिलेली असतांना सुध्दा नगरविकास विभागातील अधिकारी हे अशा प्रकारच्या भ्रष्ट आरोप असलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक जळगाव शहरात करून काय साध्य करू ईच्छितात यामागे निश्चितच काही काळेबेरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
अधिक माहिती घेतली असता असे कळले की , श्री. आर. एम. पाटिल यांनी जळगाव शहरातील एका वादग्रस्त बिल्डर कडुन बराच मोठा खर्च नगरविकास विभागात करून तसेच महसूल विभागातील कार्यरत एका अधिकाऱ्याची स्वतःला जळगाव जिल्ह्याच नव्हे तर जळगाव महापालिकेत नियुक्त करून घेतले आहे .
जळगाव नगररचना विभाग बि. जे. मार्केट येथे कार्यरत झाल्याबरोबर श्री. आर. एम. पाटिल ( सहाय्यक संचालक नगररचना ) यांचे नागरिकांशी फटकळ बोलणे, विशिष्ट मग्रूरीत राहणे या स्वभावाचा प्रत्यंतर येत आहे.
तरी जळगाव येथे श्री. आर. एम. पाटिल यांच्या नियुक्तीची सखोल चौकशी करण्यात यावी असे जनहीतार्थ निवेदन छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी नगरविकास मंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे यांना दिलेले असुन त्याची प्रत माहितीसाठी जिल्हाधिकारी जळगाव , मा.प्रधान सचिव , ( न.वि. 1 ) नगरविकास विभाग , मुंबई , महाराष्ट्र ., मा. संचालक , नगररचना विभाग , पुणे ,महाराष्ट्र . यांना पाठवली आहे .