<
जळगाव – (प्रतिनिधी) – दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास बोर्ड, प्रादेशिक संचालनालय, नाशिक द्वारा दोन दिवसीय असंघटित महिला कामगार शिक्षण कार्यक्रम दिनांक 14 आणि 15 जुलै2021 रोजी, सिद्धिविनायक मंदिर हॉल, शिक्षक कॉलोनी, पिंपराळा शिवार, जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमातून महिलांना विविध विषयांवर माहिती देण्यात आली, यात प्रामुख्याने विविध सरकारी योजना, महिला स्वयं सहायता समुह व स्वयंरोजगार, अंधश्रद्धा व वाईट चालीरीती, आरोग्य व स्वच्छता, महिलांसाठी कायदेशीर तरतुदी इत्यादी. या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी श्री दिगंबर कटारे, ऍड. अंजली कुलकर्णी, डॉ अपर्णा मकासरे, श्री रागिब अहमद, सौ शुभश्री दफत्तरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप दिनांक 14 जुलै रोजी जळगाव महानगर पालिका उपयुक्त श्री शाम गोसावी यांच्या उपस्थितीत, संपन्न झाला. त्यांनी महिलांना त्यांचे कौटुंबिक उत्पन्न वाढण्यासाठी काय करायचे याचा अकॅशन प्लॅन समजावून सांगितला.
नाशिक विभागाच्या प्रभारी प्रादेशिक संचालिका सौ सारिका डफरे यांनी या दोन दिवसात महिलांना सक्षम होण्यासाठी आवश्यक असणारे अडथळे दूर करण्यासाठी अतिशय सोप्या शब्दात मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोर्डाच्या समन्वयक सौ अनिता वाघ यांनी परिश्रम घेतले.