<
जळगाव, दि.१४ – जिल्ह्यातील रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र, उडाण प्रारंभिक बाल विकास केंद्र जळगाव तसेच इनरव्हील क्लब बाय बॉम्बे बे व्ह्यू यांच्या संयुक्त विद्यमाने आज या जागतिक महामारी विरुद्ध लढण्यासाठी कुपोषित तसेच दिव्यांग मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकस आहाराचे वाटप करण्यात आले. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व डॉ.अमृता मुंढे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
उडाण फाऊंडेशनतर्फे नेहमी विविध उपक्रम राबविले जात असतात. जिल्ह्यातील ५० कुपोषित, गरजू आणि दिव्यांग बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी महिनाभरासाठी प्रोटीन पावडर, खजूर व सकस आहाराचे वाटप करण्यात आले.
उपक्रमासाठी इनरव्हील क्लब बॉम्बे बे व्ह्यूच्या अध्यक्षा अस्मिता झुनझुनवाला, रजनी बारासिया व श्यामा भोसले यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमासाठी उडाणच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, विनोद शिरसाळे, संदीप पाटील, धनराज कासट, चारू इंगळे, चेतन वाणी, तुषार भामरे, पवन शिरसाळे, जयश्री पटेल, चेतन कुमावत व नीता मिश्रा यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात पोलीस अधिक्षकांची चिमुकली देवयानी हिने दिव्यांग बालकांशी मस्ती करत छान संवाद साधला.