<
जळगाव, (जिमाक) दि. 15 – राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
कौशल्यातून रोजगाराकडे (दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व शेळीपालन) या विषयावर शुक्रवार 16 जुलै 2021 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत मार्गदर्शन सत्र होणार आहे.
या मार्गदर्शन सत्रास नंदूरबार कृषि विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र दहातोंडे हे दुपारी 3 ते 3.30 वाजता, डॉ. धनराज चौधरी, शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, धुळे हे दुपारी 3.30 ते 4 या वेळेत तर बाबासाहेब सोळांकूर पाटील (महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे) कृषी पर्यटन तज्ञ हे दुपारी 4 ते 4.30 या वेळेत मार्गदर्शन करणार असून दुपारी 4.30 ते 5 या वेळेत प्रश्नोत्तरे घेण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ राजपाल, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
फेसबुक – https://www.facebook.com/MaharashtraSDEED
युट्युब – https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A