<
जळगांव (प्रतिनिधी):-
ग्राहकांच्या न्याय हक्का साठी, ग्राहकांच्या फसवणुकी ,अपहार, लुबाडणूक होऊ नये म्हणून भारत ग्राहक संरक्षण कायद्याची अमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
ग्राहकांच्या न्याय हक्क व संरक्षण करीता निरंतर झटणाऱ्या ग्राहक संरक्षण समितीचे कार्य हे नेहमी च वाचनास मिळते. ग्राहक संरक्षण समिती ही ग्राहक संरक्षण कल्याण अधिकार अधिनियम १९८६/२०१९ च्या द्वारे भारतभर कार्य करते. ग्राहक संरक्षण अभ्यास, कायदेविषयक माहिती, सामाजिक कार्य आणि स्वयं इच्छाशक्ती ला पाहता जळगांव जिल्हा कायदेशीर सल्लागार या पदावर समिती पदाधिकारी याच्या सहमतीने वकील श्रीकांत सोनवणे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती ३१/१२/२०२२ या एकवर्षा साठी असून जिल्हा कायदेशीर सल्लागार म्हणून श्रीकांत सोनवणे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. ‘जागो ग्राहक जागो’ तसेच जागृत ग्राहक या संज्ञा जिल्हा,तालुका, वार्ड, गाव स्तरावर शाखा निर्माण करून स्व-इच्छाने कार्य करणाऱ्या जिज्ञासु, कायदेविषयक ज्ञान असणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकारी याची नियुक्ती करण्याचे अधिकार ही सोनवणे यांना प्रदान करण्यात आले आहे.
सदर नियुक्ती ही पत्रावर मा.एस.एस.साबणे साहेब माजी न्यायाधीश कायदेशीर सल्लागार, मा.अनिलजी वैद्य साहेब माजी न्यायाधीश कायदेशीर सल्लागार, संदिप जाधव राष्ट्रीय उपाध्यक्ष, मा. दादाभाऊ केदारे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार झाली आहे.
तसेच श्री. राजेश आंधळे राष्ट्रीय महासचिव, श्री. सुनिल शिंदे -मुंबई राष्ट्रीय महासचिव, श्री. सिध्दार्थ मोरे राष्ट्रीय प्रवक्ता ,श्री. राष्ट्रीय संपर्क प्रमुख श्री. नितीन डांगळे आणि राष्ट्रीय कोषाध्यक्ष राहुल गवारे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तर मा. अजिता घोडगांवकर राज्य अध्यक्षा (महिला विभाग),श्री. सत्यजित जानराव महाराष्ट्र राज्य सचिव, श्री. निवृत्ती रोकडे सर महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष, मा. रविंद्र पारधे सर राज्य प्रवक्ता ,प्रा. दिपक जाधव ,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा. सुरेंद्र सी. मोरे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख यांनी या नियुक्ती बद्दल शुभेच्छा दिल्या आहे.सदर नियुक्ती बद्दल श्रीकांत सोनवणे यांचे जिल्ह्यात सर्वत्र1कौतुक होत आहे.