<
जळगाव – गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी अभियांत्रिकी महाविदयालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विदयापिठ, लोणेरे व इंटरनॅशनल जरनल ऑफ इनोव्हेशन्स इन इंजिनिअरिंग अॅण्ड सायन्स यांच्या संयुक्त विदयामाने दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील संशोधक व तज्ञ, अभियंते यांना त्यांचे संशोधन मांडण्यासाठी व्यासपिठ उपलब्ध करुन देणे व चर्चा घडवून आणणे त्यानंतर परिषदेमध्ये चर्चिलेले सर्व निष्कर्ष जरनलमध्ये प्रकाशित करण्यात येतील. परिषदेमध्ये एकुण ८० संशोधकांचे संशोधन प्रकल्प सादर केले जाणार आहेत.
गोदावरी अभियांत्रिकीत आयोजित परिषदेचे उदघाटन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांचे हस्ते उद्या १६ रोजी होणार असुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विदयापिठाचे प्रा. डॉ. डी.बी.देवसरकार यांचे बिजभाषण होणार आहे. अभियांत्रिकीच्या विविध शाखांचे संशोधनकर्ते कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल च बेसिक सायन्सेस या विषयांमध्ये आपले संशोधन ऑनलाईन सादर करतील. संशोधन सादर करीतेवेळी तज्ञ मार्गदर्शक प्रत्येक क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कॉम्प्युटर विषयासाठी प्रा.डॉ. मनोज ई. पाटील, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशनसाठी प्रा. डॉ. अनिल जे. पाटील, मेकॅनिकलसाठी प्रा.डॉ. ए.डी.विखार, इलेक्ट्रीकलसाठी प्रा. डॉ. किशोर भदाणे, हयुमॅनिटीज व बेसिक सायन्सेससाठी प्रा.डॉ.आर.बी. वाघुळदे यांचे अनमोल सहकार्य लाभणार आहे.
संशोधन पेपर प्राप्त
परिषदेसाठी कॉम्प्युटर विभागात २० संशोधन पेपर प्राप्त झाले असुन इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागात १०, मेकॅनिकल विभागात २५, इलेक्ट्रीकल विभागात १५ व बेसिक सायन्सेस विभागात १० संशोधन पेपर सादर केले जाणार आहेत. महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अॅकेडेमिक डिन व परिषदेचे समन्वयक प्रा. हेमंत इंगळे व उपसमन्वयक प्रा. विजय डी. चौधरी यांनी परिषदेचे नियोजन केलेले आहे. परिषदेच्या सल्लागार समितीमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकीत संशोधकांचे मार्गदर्शन लाभले.