<
पाळधी-(प्रतिनिधी) – येथिल इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये महाराष्ट्र शासन आदेशा नुसार काविड मुक्त गावांत शाळा सुरू करण्यासंबधी पालक सभा ऑनलाईन घेण्यात आली.
शाळा प्रशासनाने महाराष्ट्र शासनाच्या आदेशा नुसार वर्ग 8 ते 10 चे वर्ग ऑफलाईन सुरू करण्याबाबत निर्णय घेतला असुन तसा पाळधी ग्रामपंचायतीने शाळा सुरू करण्याबाबतचा ठराव शाळेस दिलेला आहे. शासन परिपत्रका नुसार शाळेचा परिसर निर्जंतुक करण्यात आलेला असुन, प्रत्येक वर्गात 20 विदयार्थी व एका बेंचवर एक विदयार्थी बसविण्याचे नियोजन शाळेने केलेले असून शाळा दि. 19/07/2021 पासुन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असे शाळेचे प्राचार्य श्री. महेश कवडे यांनी कळविले आहे.