Wednesday, July 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एसटीच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यावर राहणार भर – परिवहन मंत्री अनिल परब

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
एसटीच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यावर राहणार भर – परिवहन मंत्री अनिल परब

बसस्थानके, मध्यवर्ती कार्यशाळेची परिवहनमंत्र्यांकडून पाहणी

औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका) :  कोरोना काळात नागरिक प्रवास करत नसल्याने एसटीची आर्थिक स्थिती बिकट झाली. आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मालवाहतूक, एसटीसाठी वापरणारे पेट्रोल पंप, टायर रिमोल्डींग जनतेसाठी खुले करून उत्पन्न वाढीच्या स्त्रोतांचा विचार करत असल्याचे परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष ॲङ अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

एसटी गरिबांची जीवनवाहिनी आहे. राज्यातील सर्व नागरिक इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी एसटीचा वापर करतात. आता एसटीला पूर्ण क्षमतेने, व्यवस्थित चालण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेला भेट दिली आहे. यामध्ये अजून काही सुधारणा करण्याबाबतचा विचार सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यशाळेच्या साठा बांधणी, इंजिन आदी विभागांना मंत्री परब यांनी भेट दिली. यावेळी कार्यशाळेचे व्यवस्थापक किशोर सोमवंशी यांनी सुरू असलेल्या कामांबाबत मंत्री परब यांना सविस्तर माहिती दिली.

परिवहन मंत्र्यांचा प्रवाशांशी संवाद

कार्यशाळेच्या पाहणीनंतर शहरातील सिडको बसस्थानक व मध्यवर्ती बसस्थानकाचीही मंत्री परब यांनी पाहणी केली. मध्यवर्ती बसस्थानकामध्ये औरंगाबादहून शिर्डी जाणाऱ्या बसमध्ये स्वत: मंत्री परब यांनी प्रवेश करत श्रीरामपूरच्या विकास पोपळघट या प्रवाशाशी संवाद साधला.

या पाहणी दरम्यान मंत्री परब यांच्यासमवेत महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, औरंगाबाद विभाग नियंत्रक अरुण सिया आदींसह महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘आम्ही तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका’ लोणकर कुटुंबीयांना दिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धीर

Next Post

जिल्हास्तरीय घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आराखडा एकदिवशीय प्रशिक्षण संपन्न

Next Post
जिल्हास्तरीय घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आराखडा एकदिवशीय प्रशिक्षण संपन्न

जिल्हास्तरीय घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आराखडा एकदिवशीय प्रशिक्षण संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo