<
जळगाव – (प्रतिनिधी) – गट समन्वय व समूह समन्वय यांचे जिल्हास्तरीय घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन गांवकृती आराखडा बाबत एकदिवशीय प्रशिक्षण हे सावखेडा खु!! ता.जळगांव येथे घेण्यात आले.
प्रशिक्षणासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष गावाचे प्रथम नागरीक सौ.सरला अरविंद सपकाळे हे होते.तसेच प्रमुख मार्गदर्शक व प्रशिक्षण उद्घाटक म्हणून म.श्री.दिगंबर लोखंडे( उपमुख्ख कार्यकारी अधिकारी पावस्व जि.प.जळगाँव) हे होते.
मार्गदर्शनात साहेबांनी हा आराखडा किती महत्त्वाचा आहे व प्रत्येकाची जबाबदारी काय आहे हे सांगितले.,श्री.सोनार सर (शाखा अभियंता एरंडोल) यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले व श्री.मनोहर सोनवणे (क्षमता बांधणी तंज्ञ स्वच्छ भारत अभियान कक्ष जि.प.जळगाव )यांनी गांवकृती आराखडा कसा तयार करावा याबाबत प्रत्यक्ष क्षेत्रकार्यावर भेट देऊन समजून सांगितले.या प्रशिक्षणास जिल्हास्तरावरुन श्री.दिपक राजपूत(जल निरीक्षक जि.प.),श्री.भिमराव सुरदास(समाजशास्ञज्ञ),श्री.निलेश रायपूरकर (माहिती ,संवाद व शिक्षण तंज्ञ जि.प. ) हे उपस्थित होते.तसेच गांवतील ग्रामपंचायतचे उपसरपंच , सदस्य,अंगणवाडी सेविका,मदतनीस,संगणक आॕपरेटर,जलसुरक्षक व गांवातील जेष्ठ नागरीक हे उपस्थित होते.