Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी तयारी करावी – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी तयारी करावी – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका) :  कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार व प्रतिबंधासाठी औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने अविरतपणे काम केले आसून ते कौतूकास पात्र आहेत.

परंतु आगामी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयायांनी ऑक्सीजन बेडसह, लसीकरण, अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आवश्यक मनुष्यबळ उपलब्धतेसाठी प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्यासह विभाग प्रमुखांना आज वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

यावेळी बैठकीस आमदार कल्याण काळे, विलास औताडे, नामदेव पवार, जितेंद्र देहाडे, रवींद्र काळे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

बैठकीच्या सुरूवातीला डॉ. कानन येळीकर यांनी औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना कालावधीत केलेल्या विविध कामाचा आढावा सादरीकरणाद्वारे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासमोर सादर केला. यामध्ये कोविड तपासणी प्रयोगशाळा, आजवर केलेल्या तपासण्यांची आकडेवारी, ऑक्सीजन निर्मिती व वाढ, कार्यरत मनुष्यबळ याबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचे प्रशिक्षण व सक्षमीकरणाबाबत माहिती सादर केली.

पुढे बैठकीत देशमुख म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित असलेल्या सर्व प्रस्तावांना मान्यता देत असून यामध्ये संरक्षण भिंत बांधकाम, नवजात अर्भक विभागाची निर्मिती, ट्रॉमा केअर सेंटर भाग-2, मॉड्युलर ऑपरेशन थिअटर त्याच प्रमाणे कंत्राटी स्वरूपातील कर्मचारी यांनी सेवेत  सामावून घेण्याबाबतचे प्रस्ताव शासन स्तरावर मांडणार असल्याची  ग्वाही यावेळी श्री. देशमुख यांनी दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने राज्याला दिशादर्शक असे काम करून आरोग्य सेवेचे एकचांगले उदाहरण घालून दिल्याने मी संपूर्ण टिमचे कौतुक करतो. याबरोबरच आरोग्य सेवेविषयी असलेले कोणतेही प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित राहणार नाही. तसेच या प्रस्तावांना जलद गतीने मान्यता देऊन निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही श्री. देशमुख यांनी बैठकीदरम्यान दिली. तसेच आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचारी यांना शासन नियमांच्या अधीन राहुन मदत करण्याचा प्रयत्न वैद्यकीय शिक्षण विभाग करीत आहे, असे प्रतिपादन श्री. देशमुख यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महाराष्ट्र पोलीस दल हे सर्वोत्तम – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे गौरवोद्गार

Next Post

नूतनीकरण केलेल्या पुणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d