<
भडगाव(प्रतिनिधी)- देशातील तरुणाईला दिशादर्शक असणारी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविध उपक्रम राबवणारी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया अर्थातच भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची पुढील १ वर्षासाठी भडगाव तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून सदर भडगाव कार्यकारणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ ‘सहवास’ (विशेष मुलांचे निवासी संकुल) वनकोठे (एरंडोल) येथे शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करुन निवडक लोकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सहवास संकुलास युवा परीषदेच्या माध्यमातून जिल्हा उपाध्यक्षा दिव्या भोसले व जिल्हा समन्वयक स्वप्निल निकम यांच्या वतीने सामाजिक दायित्वातून धान्य व विद्यार्थ्यांना दैनंदिन वापरातील जिवनावश्यक वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या व सहवास प्रकल्पाचे प्रमुख समाधान सावंत यांचा सेवा कार्याप्रित्यर्थ युवा परीषदेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील व जिल्हा समन्वयक नेहा मालपूरे यांनी कृतज्ञतापूर्वक सन्मान केला.विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी अर्चना पाटील, प्रतिक्षा सोनवणे व प्रेरणा पाटील यांनी सुरेल असे स्वागतगीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्रतिक पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील होते तर प्रमूख पाहुणे जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर, सहवास प्रकल्पाचे प्रमुख समाधान सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जावळे, दिव्या भोसले, जिल्हा महासचिव सागर महाजन, जिल्हा कोषाध्यक्ष शुभम पाटील, जिल्हा सचिव आकाश पाटील, आकाश धनगर, कोमल पाटील, जिल्हा समन्वयक इरफान पिंजारी, भावेश रोहीमारे, स्वप्निल निकम, विद्या कोळी, नयनकुमार पाटिल, नेहा मालपुरे, सागर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त तालुकाध्यक्ष प्रतिक पाटील, उपाध्यक्ष चेतन राजपुत, महासचिव अश्विनी सोमवंशी, बांबरुड राणिचे येथिल युवा आदर्श व प्रयोगशिल शेतकरी सचिव मयूर अरुण वाघ, कृष्णा भोसले , प्रतिक्षा सोनवणे, कोषाध्यक्ष अमोल पाटील, समन्वयक यश शिंपी, ललित पाटील, दर्शना गोसावी, प्रेरणा पाटील, अर्जुन पवार, अर्चना पाटील या पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र, मास्क व माहिती पत्रक प्रदान करुन सन्मानित करण्यात आले, तसेच सहवास प्रकल्पाच्या परिसरात युवा परीषदेच्या वतीने वृक्षारोपण करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्विकारण्यात आली. यावेळी युवा शिवव्याख्याते हर्षल पाटील(पाचोरा) यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका महासचिव अश्विनी सोमवंशी यांनी केले तर तालुका सचिव प्रतीक्षा सोनवणे यांनी आभार मानले.