<
मा.आ.अप्पासाहेब किशोर पाटील यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील व अप्पांच्या सहवासाची एकवीस वर्षे
एरवी सहवासाची दोन पाच वर्षे जरी सोबत झाली तरी अनेकदा जवळच्या नात्यातील सहवासातही दुरावा येते, समज -गैरसमज मान -अपमान यामुळे नाते दुभंगतात.अगदी रक्ताची नाते,पती -पत्नी नातेवाईक मित्र हे देखील याला अपवाद नाहीत.मात्र याला छेद देत आमदार किशोर पाटील व त्यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांच्या सहवासाला मात्र दोन दशकांपेक्षा अधिक काळ अर्थात एकवीस वर्षे होऊन देखील नात्यातील ओलावा मात्र कायम असून हे नाते अधिकच वृद्धिंगत होत गेले आहे.लहान मोठे भाऊ जसे एकमेकाला सांभाळतात तसाच जिव्हाळा त्यांच्यात कायम पहावयास मिळत असल्याने अनेकांना याचे आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही !
पाचोरा- भडगाव तालुक्याचे लोकप्रिय तथा कार्यसम्राट आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या कामाची जबाबदारी सांभाळणे म्हणजे एक अग्निदिव्यच ! अप्पांच्या कामाचा प्रचंड कामाचा आवाका, कामांचा उरक आणि सतत जनते मध्ये राहून त्यांच्या समस्यांची सोडवणूक, मतदार संघातील प्रश्न त्यांचा पाठपुरावा,सततचा प्रवास,विकास कामांसाठी लागणारा निधी, अधिकारी, पदाधिकारी यांच्यातील समन्वय व संवाद, प्रसिद्धी माध्यमांशी सलोखा अशा एक ना अनेक जबाबदाऱ्या लीलया सांभाळणारे राजेश दत्तात्रय पाटील हे अप्पासाहेबांसह सर्वांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तीमत्व !
वास्तविक आमदार किशोर अप्पा यांचे प्रचंड काम, त्यांचा अफाट जनसंपर्क यात शिवसेना पक्ष,जिल्हा बँक, जिल्हा दुधसंघ आदि जबाबदाऱ्या सांभाळत सर्व कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत सलोखा त ठेवत कोणाचेही मन दुखणार नाही आणि सर्वांचे काम होईल ही जबाबदारी सांभाळणे ही अवघड जबाबदारी ते संयमाने पार पाडतात.
मुळात अप्पा हे आमदार झाले ते गेल्या सुमारे सात वर्षांपूर्वी मात्र त्याआधी ते शिवसेना संघटनेत आले तेव्हा पासून म्हणजेच आमदार पदाच्या आधी सुमारे एक तप त्यांनी अगदी तुटपुंज्या मानधनावर कोणतीही पदाची लालसा न ठेवता इमानेइतबारे आपले काम केले. आणि म्हणूनच अप्पासाहेबांसारख्या पारखी माणसानेही त्यांना सतत जबाबदारी वाढवली. स्वीय सहाय्यक मा. श्री. राजेश पाटील यांना राजा सारखे मन असलेले राजेश राजुभाऊ ही उपमा दिली आहे.
पाचोरा, भडगावच्या गावागावातील, गल्लीबोळातील तसेच पाचोरा, भडगाव शहरांच्या प्रत्येक नागरिकांना त्यांनी आपलेसे करुन घेतले असल्यामुळे समस्याग्रस्त व्यक्ती, पदाधिकारी थेट राजुभाऊंना भेटून समस्या सांगत असतात.या समस्येवर ते पूर्णपणे आपण काय केले पाहिजे , काय करुन घेतले पाहिजे गावातील समस्या सोडवतांना त्या कशा पध्दतीने सोडवता येतील तसेच पाचोरा, भडगावसह मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक गावात कोणकोणत्या योजना राबवल्या पाहिजे, कोणकोणती कामे केली पाहिजे याबाबत आमदार साहेबांना सविस्तर माहिती देऊन आपली जबाबदारी सांभाळूत असतात. पाचोरा तालुका व शहरामध्ये कोणकोणती कामे केली पाहिजे यासंदर्भात आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांना सविस्तर माहिती देऊन तळागाळातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व योजना राबवण्यासाठी सगळी माहिती पुरवून त्याचा पाठपुरावा करुन ते प्रश्न व समस्या मार्गी लावण्यात मा.श्री. राजु दादांचा हातखंडा आहे.
त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावातील रस्ते, स्मशानभूमी, सांडपाण्याच्या गटारी, सार्वजनिक शौचालय, व्यायाम शाळा, वाचनालये, क्रिडा साहित्य स्मशानभूमी, बस स्टॅन्ड पाचोरा शहरातील भुयारी गटारी शॉपिंग सेंटर, विद्यार्थ्यांकरिता लायब्रर, हुतात्मा स्मारक पाण्याचा प्रश्न, कृष्णापुरी पुल, कोंडवाडा गल्ली पुल, स्मशानभूमी जवळील पूल असे अनेक कामे मा.आ.किशोर अप्पांच्या मार्गदर्शनाखाली व पाचोरा नगरपरिषदेच्या माध्यमातून कामाची रूपरेषा बनवून त्याचा प्रस्ताव तयार करून आमदार साहेबांना सर्व कामाची फाईल तयार करून मंत्रालयातून करोडो रुपयांचा निधी आणून शहराचा व तालुक्याचा कायापालट केला आहे.
असे हे मनमिळाऊ स्वभावाचे फक्त नावानेच राजेश नसून नावातील पहिल्या दोन अक्षराप्रमाणे मानानेही ‘राजे’ असलेले राजुभाऊ आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.राजू भाऊ हे प्रेमळ असले तरी त्यांना खटकणाऱ्या चुकीच्या गोष्टींच्या बाबतीत त्यांचा स्वभाव हा अत्यंत परखड आहे.आपल्याला केवळ शिवसेना व आमदार किशोर अप्पांच्या माध्यमातून जनसेवा करायची असून कधीही लोकप्रतिनिधी होण्याचा आपला मानस नसल्याचेही ते खाजगीत सांगतात.
कोरोना महामारीच्या काळात त्यांनी आमदार अप्पासाहेबांच्या माध्यमातून अनेक गरजूंना विविध प्रकारे वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे. बाहेरगावी व राज्यात अडकलेल्या लोकांना परत येण्यासाठी त्यांनी केलेले काम वाखाणण्याजोगे होते.अनेकांचे वैद्यकीय बिल कमी करून देणे, त्यांना हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध करून देणे , रेमेडिसिव्हर इंजेक्शनची उपलब्धता करून देणे आदी अवघड कामी त्यांनी सांभाळली आहेत.
कारण आपले कामकाज सांभाळतांना राजु दादा शहरी, ग्रामीण, आपले , परके, समर्थक, विरोधक असा कोणताही भेदभाव न करता सगळ्यांच्या समस्या ऐकून घेत सगळ्यांना मदत व मार्गदर्शन करणारे एकमेव व्यक्ती मानले जातात म्हणूनच धडाडीचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांचे भडगाव व पाचोरा तालुक्यातील जनतेतून कौतुक होत असते.
शब्दांकन :- अनिल आबा येवले