Wednesday, July 23, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रॅक्टिसिंग नेट-सेट परीक्षा या राष्ट्रीय कार्यशाळेचे ऑनलाइन उद्घाटन संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/07/2021
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प्रॅक्टिसिंग नेट-सेट परीक्षा या राष्ट्रीय कार्यशाळेचे ऑनलाइन उद्घाटन संपन्न

विद्यापीठ व एसीटीचा विद्यार्थी हितासाठी आदर्श उपक्रम-प्रा‌.डॉ.बाळू पी.कापडणीस, सेट परीक्षा, समन्वयक पुणे

जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत रसायनशास्त्र प्रशाळा विभाग व असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्सने “प्रॅक्टिसिंग नेट-सेट एक्झामिनेशन इन केमिकल सायन्सेस” कार्यशाळा हा व्यापक विद्यार्थी हितासाठी राबवलेला आदर्श उपक्रम आहे असे प्रतिपादन सेट परीक्षा समन्वयक प्रा‌.डॉ.बाळू पी.कापडणीस यांनी केले.

दि.19 जुलै 2021 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत रसायनशास्त्र प्रशाळा विभाग व असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स (ACT) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना नेट/सेट परीक्षांच्या तयारी साठी लागणारे मार्गदर्शन करण्यासाठी “प्रॅक्टिसिंग नेट-सेट एक्झामिनेशन इन केमिकल सायन्सेस” या ऑनलाइन राष्ट्रीय कार्य शाळेचे उदघाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा.डॉ.ई.वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली सेट परीक्षा, पुणे समन्वयक प्रा‌.डॉ.बाळू पी.कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी डॉकापडणीस बोलत होते. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ.बी.व्ही.पवार, कुलसचिव डॉ.एस.आर. भादलीकर, माजी प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी.माहुलीकर रसायनशास्त्र प्रशाळा विभागाचे संचालक प्रा.डॉ.डी. एच.मोरे प्रमुख आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाइन उपस्थित होते तर देशभारतून 918 विद्यार्थी याप्रसंगी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे उदघाटक माननीय प्रा.डॉ.बाळू पी.कापडणीस यांनी सदर ऑनलाइन राष्ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन झाले असे घोषित करुन मार्गदर्शन करतांना नेट /सेट परीक्षा यामध्ये काय फरक आहे, अभ्यासक्रम, पायाभूत मूल्ये काय आहे, पात्रता, सेट परीक्षेचे स्वरूप, नेट परीक्षेचे स्वरूप, अटी आणि निकालाचे निकष नमूद करतांना या कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त करून या राष्ट्रीय कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना विद्यापीठाचे मा.कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांनी असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्सने विद्यार्थ्यांना नेट-सेट परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यासाठी नावीन्यपूर्ण अशा राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त करुन सहभागींना या कार्यशाळेचे कसे फायदे होतील याबद्दल मार्गदर्शन केले आणि भविष्यात अशा कार्यक्रमाचे नियोजन परिणामकारक कसे करता येईल याबद्दल विश्वास व्यक्त केला. त्यांनी संयोजन समिती, तंत्रज्ञ समिती आणि एसिटी सदस्यांचे कौतुक केले.

विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू, एसीटीचे आधारस्तंभ आणि कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. पी.पी.माहुलीकर सर यांनी असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्सचे महत्व, कार्य, उद्दिष्टे, कॉन्फरन्सचे संयोजन, संशोधन शिष्यवृत्ती साठी भविष्यात केली जाणारी व्यवस्था, सहा महिन्याने पुन्हा राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले जाईल आणि या कार्यशाळेसाठी शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार यांनी नेट-सेट परीक्षेबाबत माहिती देताना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, वेळेचे आयोजन, स्टडी मटेरियल, फायदे मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका सोडवणे हे परीक्षेच्या अगोदर करणे गरजेचे आहे आणि परीक्षा देतांना आपला दृष्टिकोन हा सकारात्मक आणि उत्साहीअसला पाहिजे असे त्यांनी नमूद केले.

असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स चे अध्यक्ष प्रा.डॉ.एस. एस.राजपूत यांनी एसीटीचे महत्व, विविध कार्यक्रमाचे आयोजन आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम भविष्यातही आयोजित करत राहू असे स्पष्ट केले. त्यानंतर रसायानशास्त्र प्रशाळा विभागाचे संचालक डॉ.डी. एच.मोरे सरांनी विद्यापीठातील प्रशाळा बद्दल माहिती वर्णित केली.

या राष्ट्रीय कार्यशाळेत पुढील विषय तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

Date:19/7-Prof. Nandkishor N.Karade, Nagpur University (Conformation & Reactivity), Date:20/7- Dr.Vishnu A. Adole, MGV’s ASC College, Manmad (Inorganic Spectroscopy & Coordination Chemistry), Dr.Bapu Shingate , Dr. BAMU , Aurangabad (Multistep Organic Synthesis), Date:21/7- Dr.Prashant Koli. ACS College , Satana ( Bioinorganic Chemistry ), 22/7- Dr. Sushilkumar Dhanmane, Fergusson College, Pune (Organic Spectroscopy), Prof. Dr.Dipak S. Dalal, KBC NMU, Jalgaon (Pericyclic Reactions) 23/7- Dr.Emmanuel Joy, Karunya University, Coimbatore, Tamilbadu( Organic Stereochemistry), Mr. Kishor M.Borse , SSVPS College, Dhule (Tricks for the Preparation of NET / SET ), Date: 24/7- Dr.Harichandra A. Parbat, Wilson College , Mumbai (Preparation Physical Chemistry Syllabus for CSIR NET & Basic Principles of Quantum Mechanics), Mr.Vivek C.Badgujar, Pratap College, Amalner (Palladium Catalyzed Reactions in Organic Synthesis), Date: 25/7- Prof.Dr.Gajanan S. Rashinkar, Shivaji University, Kolhapur (Preparation of NET / SET Examination)

उदघाटन समारंभाचे प्रास्ताविक करतांना या राष्ट्रीय कार्यशाळेचे समन्वयक डॉ.दीपक एस.दलाल यांनी सदर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन, प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांना कसे फायदेशीर असेल याविषयी माहिती दिली. कार्यशाळेचे सुत्रसंचालन सहसमन्वयक प्रा. के.एम.बोरसे यांनी तर एसीटीचे सचिव डॉ.गुणवंत सोनवणे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
ACT चे उपाध्यक्ष प्रा.ए.एम.नेमाडे, उपाध्यक्ष डॉ.एम.के.पटेल, श्री.एम.टी.चौधरी, डॉ.आर.व्ही.पाटील, डॉ.सी.व्ही.नांद्रे, डॉ.एच.ए.महाजन, एसीटीचे प्रसिध्दी विभाग प्रमुख डॉ.पी.एस.गिरासे,डॉ.प्रियांका सिसोदे, डॉ.भरत.एन.पाटील व डॉ.मनोहर पाटील यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कीटकनाशक दुष्परिणामांवर उपचारासाठी अधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न

Next Post

पंढरपुरात पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोनाविषयक आढावा ; संभाव्य तिसऱ्या लाटेत अधिक जबाबदारीने काम करण्याच्या प्रशासनाला सूचना

Next Post
पंढरपुरात पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोनाविषयक आढावा ; संभाव्य तिसऱ्या लाटेत अधिक जबाबदारीने काम करण्याच्या प्रशासनाला सूचना

पंढरपुरात पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोनाविषयक आढावा ; संभाव्य तिसऱ्या लाटेत अधिक जबाबदारीने काम करण्याच्या प्रशासनाला सूचना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications