<
जळगाव – (प्रतिनिधी) – केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील विद्या मंदिर एम जे कॉलेज जळगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम शाळेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी यांच्या पालखीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा करून कार्यक्रम सादर केले उपशिक्षक योगेश भालेराव यांच्या विठू माऊली तू माऊली जगाची या गीतावर सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच पालक यांनी ठेका धरत पावली खेळले तर उपशिक्षक सूर्यकांत पाटील तसेच स्वाती पाटील यांनी सुंदर अशी भजने यावेळी सादर केले.
(विठ्ठलाची)भूमिका उज्वल खैरनार, (रुक्मिणी )सोनम देवरे , (ज्ञानेश्वर) गौरांक थोरवे , ( मिराबाई) अनुष्का पाटील (मुक्ताबाई) मानसी बारी , (वारकरी ) जिग्नेश ठाके आणि भार्गवी गाढे, आराध्या पाटील तसेच भूवन पाटील यांनी भूमिका साकार केल्या.
प्रसंगी उपशिक्षिका सरला पाटील , कल्पना तायडे , धनश्री फालक, दिपाली चौधरी , अशोक चौधरी , सुनील नारखेडे सुधीर वाणी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.