<
जळगाव -बेटी बचाव,बेटी पढाओ हा शासनाचा सामाजिक समतोल राखणारा उपक्रम,गत काही वर्षांमधील अनधिकृत सोनोग्राफी सेंटरांची तपासणी, गर्भातील लिंग तपासणी करणाऱ्यांवर झालेल्या कायदेशिर कारवाया समाज आणि संबंधित यंत्रणा यांच्यातील समन्वाने जिल्हयातील मुलींचा जन्मदर बऱ्यापैकी वाढला आहे. जिल्हयात मुलींचा जन्मदर आशादायक असला तरी गर्भलिंग तपासणी पूर्णपणे बंद होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आप-आपसात समन्वय ठेवून अचानकपणे सोनोग्राफी सेंटरांची तपासणी करून बेकायदा गर्भलिंग तपासणी करणाऱ्यांवर जरब बसण्यासाठी या मोहिमेत सातत्य असायला पाहिजे अशे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गडीलकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सभा दालनात आयोजित जिल्हास्तरीय बेटी बचाओ बेटी पढाओ कृतीदलाच्या सभेत दिल्या. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील, महिला व बाल विकास अधिकारी विजसिंग परदेशी, जिल्हा परिषदेचे महिला बाल विकास अधिकारी तडवी, सामान्य रुग्णालय,जिल्हा आरोग्य कार्यालय जि.प,महानगर पालिका आरोग्य विभाग, महिला बाल विकास,समाजकल्याण विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर हे पुढे म्हणाले की, जिल्हयाचा मुलींचा जन्मदर जरी उंचावला असला तरी काही तालुक्यांमधून अजूनही वाढणे अपेक्षित आहे. म्हणून अशा मोहिमेत गावपातळीपर्यंच्या सर्व घटकांना सामाऊन घेवून सर्व माध्यमांतून त्याचा प्रचार व प्रसार करावा. शाळाबाह्य मुलींचे गांव,तांड्यापर्यंत सर्वेक्षण होवून एकही मुलगी शाळेच्या बाहेर राहून शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकीतून दक्षता घ्यावी. तसेच मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी आणि एकही मुलगी शाळाबाह्य न रहाता त्या शाळेत जातील यासाठी सर्वांनी सर्वांशी समन्वय ठेवून विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी संबंधितांना दिल्यात. हे करित असताना या कामात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना त्यांनी केलेल्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या कार्यात सहभाग दिल्याबद्दल त्यांना व इतरांना प्रोत्साहन मिळण्यासाठी अशा व्यक्ती आणि संस्थांचा जाहिर कार्यक्रमात प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देवून त्यांचे मनोबल बाढविण्याच्या सूचनाही शेवटी श्री.गाडीकर यांनी दिल्यात.