<
पाळधी/जळगांव(चेतन निंबोळकर)- आज रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमीत्त नोबल इंटरनॅशनल स्कूल पाळधी येथे जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे आश्रयदाते श्री.भगवान शंभर सुर्यवंशी, अध्यक्ष श्री.प्रशांत सुर्यवंशी,सौ. अर्चना सुर्यवंशी व शाळेचे मुख्याध्यापक योगेश करंदीकर यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतीमेचे पुजन करून त्यांच्या बालपणाची माहीत देऊन दहीहंडीचे पुजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आपले कलागुण सादर केले. यात विद्यार्थी श्रीकृष्ण व राधाच्या वेशभूषेत आले होते. पहिली ते पाचवीच्या गोविंदांसह गोपिका पथक ही दहीहंडी फोडण्यासाठी उत्सुक दिसत होत्या. शेवटी तिसरी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांनी तिन थर रचून दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. अशा वातावरणामुळे नोबल स्कुलची जणू गोकुळनगरी झाली असे यावेळी दिसून आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उज्वला झंवर, गुणवंत पवार, नयन आरखे, सतिष पाटील यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.