<
जळगाव, (जिमाका) दि. २२ – राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत शुक्रवार, २३ जुलै, २०२१ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन शिबिरात आकाश मोरे, उपमहाव्यवस्थापक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मर्या. मुंबई हे दुपारी ३ ते ३.३०, दत्तात्रय थावरे, प्रादेशिक अधिकारी व विभाग प्रमुख, एमसीईडी, औरंगाबाद हे दुपारी ३.३० ते ४ या वेळेत तर विश्वास चितळे, डायरेक्टर, चितळे ग्रुप, पुणे हे दुपारी ४ ते ४.३० या वेळेत स्पर्धा परीक्षा तयारीवर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यानंतर दुपारी ४.३० ते ५ या वेळेत प्रश्नोत्तरे घेण्यात येणार आहे.
या मागदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले आहे.
फेसबुक – https://www.facebook.com/MaharashtraSDEED
युट्युब – https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A
००००