<
जामनेर / प्रतिनीधी -शांताराम झाल्टे
तालुक्यातील केकतनिंभोरा या गावी पाणी पुरवठा होणाऱ्या वाघुर योजनेच्या पाईप लाईनचे पाणी गावाला मिळण्यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून वाघुर योजनेचे पाणी साठवुन ठेवण्यासाठी बसकी टाकी बांधण्याचे काम हाती घेतले होते.
सदरील काम 45 दिवसात पुर्ण करून गावाला वाघुर धरणाचे शुद्ध पाणी गावाला मिळेल असे आश्वासन धरून म.न.सेनेचे उप जिल्हाध्यक्ष अशोक कृष्णा पाटील केकतनिंभोरा यांनी स्थगिती दिली होती .मात्र 18 महिने उलटल्या नंतर ही बसकी टाकीत पाणी व तसेच मोटर टाकण्यात आले नसल्याने ग्रामस्थांना गावातील सरकारी विहिरीतील, तसेच नदितील ,गटारीचे, सार्वजनिक शौचालयाचे पाणीच प्यावे लागत आहे . यामुळे सदरील पाण्याचे परिक्षण व पात्रता बघता आपल्यालाही धक्का बसल्यागत होईल.महाभंयकर कोरोना सदृश्य परिस्थितीचे भान लक्षात घेता कुणीही दवाखान्याची पायरी चढू नये.
यासाठी काळजी घेत असतांना अशा दूशीत पाण्यामुळे नागरिकाचे जीव धोक्यात आले असता म.न.सेने तर्फे पंचायत समितीच्या दालनात आमरण उपोषणाचा ईशारा करण्यात आला आहे. मागण्या या प्रकारे १)ग्रामपंचायत मालकीच्या आर .ओ. चे शुद्ध मोफत द्यावे. २)दलित वस्तीतील वार्ड क्र ३ मधील १८ घरकुल धारकांना मोटार सायकलीने किंवा टॅकर ने पाणी वाहुन नेण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात यावी.अशा मागण्यांना अनुसरून उपोषणाच्या वेळेस म.न.सेना जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील व आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.