<
पाळधी(वार्ताहर)- गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. या दिवशी शाळेत, मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत, आश्रमात, गुरूकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. याच निमित्ताने आज पाळधी येथील नोबल इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शाळेच्या संचालिका अर्चना सूर्यवंशी यांनी सरस्वतीचे पूजन करुन सर्व शिक्षकांना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील व्हिडीओ कॉल द्वारे आपल्या गुरुजनांना शुभेच्छा दिल्या. संचालिका अर्चना सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधत कोरोनाच्या या भयानक परिस्थितिला घाबरून न जाता आपल्या आरोग्यची काळजी घ्यायला सांगितले. आपले आरोग्य चांगले असेल तर आपण असेल तर आपण चांगले शिक्षण घेऊन यश संपादन करु शकतो, असे बोलताना सांगितले. यावेळी शाळेच्या संचालिका अर्चना सूर्यवंशी यांच्यासह प्रशांत सूर्यवंशी, उज्वला झंवर, समन्वयक प्रशांत सोनवणे, उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.