<
सूरज चौधरी स्कूलमध्ये प्रथम तर आनंद राका द्वितीय
जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ भवरलालजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ICSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. सूरज चौधरी हा विद्यार्थी (९४.५० टक्के) गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे तसेच आनंद रांका (९१ टक्के) गुण मिळवून द्वितिय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. एकूण ३० विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते.
अनुभूती स्कूलच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची ही नववी बॅच होती. या शैक्षणिक वर्षात सायन्सचे ०५ तर कॉमर्स विभागाचे २५ विद्यार्थी परीक्षेला होते. स्कूलचा १०० टक्के निकाल लागला. सायन्स व कॉमर्स दोन्ही फॅकल्टीचे सर्वच विद्यार्थी विशेष प्रावीण्याचे गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
कोरोनासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास केला. अभ्यासक्रम अवघड असून देखील अधिक विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.अशा परिस्थितीत देखील प्रत्येक विद्यार्थ्यावर शिक्षकांचे व्यक्तिगत लक्ष होते, ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी आपला अभ्यास सातत्याने करीत होते तरीहीते घवघवीत यश संपादन करू शकले, अशी प्रतिक्रिया अनुभूतीच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांनी दिली.
बारावीच्या विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासात नव्हे तर अन्य उपक्रमांध्ये सहभाग घेतला. स्वयंस्फूर्तपणे अभ्यासाचा ध्यास घेत विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले असे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सदिच्छा दिल्या. अभ्यासाला अनुकूल वातावरण आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे शंभर टक्के यश संपादन केले या शब्दात अनुभूती स्कूलचे वरिष्ठ सल्लागार जे. पी. राव आणि प्राचार्य मनोज परमार यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.