<
जळगाव(प्रतिनिधी)- येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या जळगाव जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील तसेच जळगाव लोकसभा प्रमुख म्हणून अविनाश पाटील तर सोशल मीडिया प्रमुख म्हणून धनंजय अहिरे यांची निवड जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ पाटील यांनी केली असून या निवडी बाबत राष्ट्रीय कोषाध्यक्ष शैलेंद्र कस्तुरे तसेच युवा स्वाभिमान पार्टीचे आमदार संस्थापक अध्यक्ष रवी भाऊ राणा व मार्गदर्शिका कर्तव्यदक्ष खासदार नवनीत राणा पक्षातील पदाधिकाऱ्यांनी नवीन कार्यकर्त्यांचे शुभेच्छा देऊन स्वागत केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.