<
जळगाव – (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची उद्या (ता.24) ला 139वी जयंती आहे. त्यानिमित्त बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून चौधरीवाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालय येथे सकाळी दहाला निमंत्रित महिलांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. कविसंमेलनातून बहिणाबाई चौधरी यांच्या आठवणींना उजाळा दिला जाईल.
जुने जळगाव येथील चौधरीवाड्यातील बहिणाबाई स्मृती संग्रहालय येथे दरवर्षी बहिणाबाईंची जयंतीचा कार्यक्रम घेतला जातो. यावर्षी निमंत्रित महिलांचे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विमल वाणी उपस्थित राहतील. तसेच प्रा. डॉ. शकुंतला चव्हाण, प्रा. चारूता गोखले, पुष्पा साळवे, प्रा.संध्या महाजन या आपल्या कविता सादर करतील. यामध्ये बहिणाबाईंच्या कविता व स्वरचीत एक कविता सादर करण्यात येणार आहे. याप्रसंगी बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टच्या विश्वस्त ज्योती जैन, श्रीमती स्मिता चौधरी, दिनानाथ चौधरी, चौधरीवाड्यातील बंधू भगिनी, अनुभूती इंटरनॅशनल रेसिडेंशील स्कूलचे मराठी विषयातील विद्यार्थी, साहित्यिक आदी उपस्थित राहणार आहेत.