<
जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे जामनेर तालुक्यातील आमखेडा गावाचे माजी सरपंच युवराज बाबुराव पाटील यांचे उत्कृष्ट कार्य असल्यामुळे व गावातील चांगले दर्जाचे कामगिरी असल्याने आज संरपच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने आणी राज्य कार्यकारणी परवानगीच्या वतीने त्यांची जळगाव जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताजी काकडे यांच्या मार्गदर्शना खाली निवड करण्यात आली.
ग्रामपंचायतींना अधिकाधिक सुविधा मिळाव्या म्हणून शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावू,ग्रामपंचायतीच्या कामकाज करतांना सरपंचाना येणाऱ्या अडचणीत संपूर्ण पणे संघटने सह तत्पर राहू,जिल्हा भर सर्व सरपंचाना ग्रामपंचायतीच्या विकास कामासाठी किती योजना राबविल्या जातात यासाठी एकसंध करून सरपंच सभा आयोजित करू अशाप्रकारचे मनोगत कार्यक्रमा ठिकाणी उपस्थित मांडले. राज्य परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या गेल्या. जामनेर तालुक्यातील विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.