<
जामनेर / प्रतिनिधी -शांताराम झाल्टे जळगाव शासकीय विश्रामगृह पदमालय येथे रयत शेतकरी संघटनेची राज्यस्तरीय बैठक जिल्हा अध्यक्ष गोपाल माळी, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल देवरे, उपाध्यक्ष शुभम तायडे, यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात संपन्न करण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
संघटनेचे मजबूती करण व शेतकरी बांधवांच्या अडी अडचणीसह विविध समस्यांचे निराकरण या विस्तृत बाबींवर चर्चा करण्यात आली . शेतकऱ्यांच्या कथा व व्यथा शासन दरबारी मांडण्यासाठी संघटना कार्यशील असणार असुन पदाधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना त्यांची भेटी गाठी घेऊन त्यांना शेतीविषयक योग्य सल्ला व पाठींबा देणार असल्याचे अध्यक्षांनी सांगीतले जिल्ह्यासह तालुक्याची पदाधिकाऱ्यांची मोर्चबांधणी करीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली . नुतन पदाधिकारी यांचा सत्कार करीत नियुक्ती पत्र देत पुढील भावी आयुष्याच्या शुभेच्छा देत .पद वितरण व मार्गदर्शन तसेच संघटनेचे पुढील ध्येय व धोरणे. यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडुन राज्यस्तरीय पदे वितरण करुन पदाधिकारी यांना संघटनेचे काम आणखी जोमाने वाढण्यासाठी मुख्य प्रदेश संघटक माननीय अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले.बैठकी मध्ये जिल्हा प्रसिध्दी प्रमुख भुषण मांडे, जिल्हा सह सचिव सुनिल इंगळे, तालुकाध्यक्ष शांताराम झाल्टे, तालुका उपाध्यक्ष अनिल शिरसाठ, युवा तालुकाध्यक्ष निवृत्ती पाटील, युवा उपाध्यक्ष नितीन इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली .त्यावेळी दिपक पाटील,रणधीर पवार, श्रीकांत मोरे, अमेय कुलकर्णी, डॉ . श्रीकृष्ण माळी, सुरज तळेकर , संदिप पाटील , तसेच संघटनेचे सर्व मुख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.