<
खरं तर वादा ला सुरुवात तिने केली च नव्हती….ती आपली नेहमी प्रमाणे सोशल मेडीआ वर ऍक्टिव्ह होती..,साधा सरळ पोळ्या बनवत असतांना चा व्हिडीओ शेयर् तिने केला होता..तिच्या पर्सनल अकाउंट वरून तिने काय शेयर करावं हे तिचे वैयक्तिक स्वातंत्र्य होत,.पोळ्या तिने कोणते कपडे घालून करावेत! त्यात ही अंतर्वस्त्रे घालूनच करावीत का!हा तिचा प्रश्न होता.आणि पोळ्या करतांना स्वाभाविक पणे तिचे अंग हलने अपेक्षित होते .
मात्र त्या अंगाला समाजाने ज्या विकृत नजरेने पाहिले त्याला काय म्हणावे?केवळ ते पाहून समाज थांबला नाही, तर तिला तिच्या वॉल वर आणि पर्सनल ला अश्लील बोलले गेले,कुणी नाहक सल्ले दिले.!… समाजाला कोणाच्या ही व्यक्तिस्वातंत्र्यावर बोलण्याची मुभा कोणत्या कायद्याने दिली आहे?
जेव्हा तिला प्रमाणाबाहेर ट्रोल केलं गेलं तेव्हा मात्र संतापली आणि तिच्या निर्भीड आणि स्पष्ट स्वभावानुसार ती ‘बाई,बुब्स आणि ब्रा ‘या पोस्ट वर व्यक्त झाली..यात तीच काय चुकले?उलट तिच्या व्यक्त होण्याने लाखो ओठावरील आणि मनातील व्यक्त न होणारी हळवी संवेदना जागृत झाली..अनेक वर्षापासून ब्रा मुळे होणाऱ्या अडचणी सहन करणाऱ्या स्त्री शरीराला मोकळा श्वास मिळाला…
स्त्री मनाची आणि शरीराची अस्मिता ही पूर्वापार पासून ऐरणी वर आजतागायत आहे हे आज या निमित्ताने पुन्हा नव्याने समोर आले ..अजून ही हा समाज स्त्री ने कसं रहावं,कसं वागावं,कुठे व्यक्त व्हावं आणि कसं व्यक्त व्हावं या वर अधिक लक्ष देऊन आहे..याच समाजातील राज कुंद्रा सारखा पुरुष एकी कडे स्त्री कडून पॉर्न व्हिडीओ करून घेऊ शकतो आणि दुसरी कडे हेमांगी सारखी स्त्री घरात ब्रा शिवाय राहू शकत नाही!ती त्यावर व्यक्त ही होऊ शकत नाही!.. मात्र तिच्या त्या अंगाकडे,तिच्या त्या हालचाली कडे विकृत नजरेने पाहणे समाजाला भावते.,आवडते…!.
किती हा विपर्यास….!आज हेमांगी कवी च नाही तर अनेक अशा स्रिया आहेत ज्यांचा सोशल मीडिया वरील मुक्त ,फ्री वावर या समाजाला मान्य नाही..सोशल मीडिया फक्त पुरुषांच्या अभिव्यक्त स्वातंत्र्याची मक्तेदारी आहे का?पुरुषाने आपले बेढब शरीराचे ,फक्त ब्रिफ वरील उघडे फोटो स्रियांनी मुकाट पणे बघावे !आणि स्रियांचे फोटो मात्र पूर्ण झाकून !कोणी सांगितले?
एफ बी,इन्स्टाग्राम,व्हाट्स अप स्टेटस ,रील एकूण सोशल मेडीआ वर स्त्री ने मुक्त व्यक्त होणे म्हणजे वचवचपणा, धांगडधिंगा..! तीच जगणं,तिची आनंदी राहन्याची पद्धत या साऱ्यांचे हक्क जणू समाजाकडे राखून आहेत…हेमांगी कवी बिनधास्त, निर्भीड आहे, ती या विरोधाला जुमाणणारी नक्कीच नाही .मात्र अशा ही स्रिया आहेत या समाजात ज्याचं रोजच आनंदी जगणं,तिचे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणे ,’तुला शोभते का’? या टॅग खाली दाबले जाते..स्त्रीयांसाठी सोशल मीडिया किती वाईट,आणि त्यांच्या फोटो चा कुठे कसा वापर होईल हे तिला सतत शिकवलं जातं आणि समाजात तुझे फोटो सतत पाहून लोक काय म्हणतील या सो कॉल्ड सतर्कतेचा प्रचंड बाऊ केला जातो…,मग ती स्त्री प्रौढ साठी पार असली तरी!!कोणत्या युगात आहे समाज आपला?.. वर्षानू वर्षं तिला समाजाच्या दडपणाखाली गाडण्याचा प्रयत्न अजून ही सुरू च आहे,ही किती खेदाची गोष्ट आहे ही..
या समाजाला स्रियांना मित्र असणे मान्य नाही,स्त्री ने आपल्या स्टेटस आणि प्रोफाइलला फोटो ठेवणे मान्य नाही,ठेवले तर ते सतत बद्लवू नये,तिच्या ऍक्टिव्हिटी जास्त अपलोड करू नये असे अलिखित बंधने स्रियांच्या सोशल मीडिया वापरावर स्वतःच टाकतो…तिच्या कडे येणाऱ्या मित्र मैत्रनि वर पाळत ठेवणारा हा समाज तिच्या चांगल्या कामाचा,चांगल्या पोस्ट ची दखल मात्र हा समाज घेत नाही..तिची प्रत्येक क्रिया विकृत नजरेने पाहतो…तीच मुक्त जगणं जणू ती चारित्र्य हीन स्त्री… आज खरं तर लाज वाटतेय की आम्ही कोणत्या समाजात जगतोय.. पूर्ण आभाळ काबीज करू शकणाऱ्या आम्हि स्रिया, केवळ पुरुषाचा इगो दुखावू नये म्हणून अर्ध्या आभाळावर खुश आहोत आणि हा समाज आज ही स्रियांना कुजक्याच नजरेने पाहतोय….
आमचे जगण्याचे ,वावरण्याचे हक्क स्वतःकडे ठेवतोय….दुसऱ्या स्त्री कडे बोट दाखवणारा हा समाज कधी कधी स्वतःच्या मुलीच्या बाबत मात्र असा टोकाचा निर्णय घेत नाही ,त्याच्या या दुटप्पी वागण्याची चीड येतेय..आणि यात प्रामुख्याने स्रिया आहेत ही खेदाची गोष्ट आहे..स्त्री स्त्रीच्या वागण्यावर नजर ठेवते,स्त्री च स्त्रीच्या मुक्त विचारांना बोल्ड आणि व्यभिचारी ठरवते..स्त्री च स्त्री ला समाजाच्या भीती खाली दाबू पाहते..धर्म,आचार,संस्कार,संस्कृती यांचे लेबल लावलेले आचरण बळजबरी गळ्यात पाडते.. स्रियांना च स्रियांच्या विरोधात जायचे आहे तर का आपण महिला दिन साजरा करावा…?अस म्हणतात की,स्त्री ला स्त्री ची वेदना कळते….पण कधी!दुसऱ्या स्वतंत्र स्त्री ला कायम विकृत नजरेने पाहण्यात स्रिया ही मागे नाही..!
स्रियांनी आपल्या विचारांच्या कक्षा व्यापक करण्याची आज वेळ आलीय..मूठ भर मुक्त,व्यापक पुरोगामी स्त्रिया या निद्रिस्त आणि कुजक्या समाजाला पूर्ण पडणार नाही..इथे समस्त स्त्री विचारांचा एकसंघ एकजूट झाली पाहिजे..मी च तुझी पाठीराखीण असा धीर तिला दिला पाहिजे..मग ती स्त्री शेजारची असो,नात्यातील असो कीं हेमांगी सारखी दूरदर्शन ओळखीची असो..माता न तू वैरीणी हे ब्रीद कायम च पुसलं गेलं तर च पुरुषप्रधान समाज ठिकाणावर येईल आणि त्याच्या विकृत नजरेला आणि बेलगाम जिभेला आवर घालेल…सोशल मीडिया असो की खाजगी वैयक्तिक आयुष्य…ज्याचं त्याचं स्वतःच आहे.. दुसर्याने त्यात डोकावू नये..आपल्या घरात काय शिजतं तेच फक्त समाजाने पहावं… अन्यथा मूठभर हेमांगी सारख्या स्रियांची वर्जमूठ होण्यास फारसा वेळ लागणार नाही हे निश्चित…