<
जळगाव – कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव ओझर नाशिक विमानतळाला देण्यात यावे तसेच मागासवर्गीय कर्मचारी यांच्या पदोन्नती बाबत राज्य सरकारचा 7 मे रोजीचे शासन परिपत्रक ( GR ) रद्द करा या प्रमुख मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मवीर दादासाहेब गायकवाड नामांतर कृती समिती तर्फे निदर्शने करण्यात आली . समितीतर्फे मा. मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात उभा महाराष्ट्र पिंजून काढला होता . त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील लाखोंच्या संख्येने आंबेडकरी जनता आंदोलनात सहभागी झाली होती . संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांचे मोलाचे योगदान होते . तसेच “कसेल त्याची जमीन नसेल त्याचे काय” हि घोषणा देत शेतमजूर कष्टकरी वंचित भूमिहीन जनतेसाठी “भूमिहीन सत्याग्रह” करून लाखो लोक तुरुंगात डांबण्यात आले होते.
या भूमिहीन सत्याग्रहामुळे लाखो नागरिकांना दादासाहेब गायकवाड यांनी शेतीचे वाटप करून शेतीचे मालक केले .
अशा महान कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव ओझर नाशिक विमानतळाला देण्यात यावे . अशी भूमिका समितीची आहे . त्यासाठी निदर्शने आंदोलन करण्यात आले . सदर निदर्शने आंदोलनात मुकुंद सपकाळे , भारत ससाणे , अमोल कोल्हे , संजय सपकाळे , हरिश्चंद्र सोनवणे , प्रा. प्रितीलाल पवार , रमेश सोनवणे , चंदन बिऱ्हाडे , समाधान सोनवणे , नाना मगरे , गौतम सोनवणे , राजू मोरे , दिलीप सपकाळे , कृष्णा सपकाळे , गौतम पानपाटिल , पिंटू सपकाळे , संजय बागूल , ऍड अभिजित रंधे , सचिन बिऱ्हाडे , महेंद्र केदारे , आकाश सपकाळे , गुरुनाथ सैंदाणे , जयपाल धुरंधर व चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले .