<
जळगाव – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयात २८ जुलै रोजी अॅन्टीरॅगिंग समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थीत सदस्यांनी रॅगिंग संदर्भातील नियमावलींवर चर्चा केली.
याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, एनजीओ संस्थांचे प्रतिनिधी डॉ.प्रशांत वारके, कायदेविषयक सल्लागार अॅड.सतिश घाडगे, पालक प्रतिनिधी एन.जी.चौधरी, वैशाली नेमाने, प्रा.साकेत सय्यद, प्रा.चित्रा म्रिधा, रेक्टर अर्चना भिरुड, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी यांच्यासह माध्यम प्रतिनिधी उपस्थीत होते. या बैठकीत डॉ.प्रशांत वारके, अॅड.सतीश घाडगे यांनी अॅन्टीरॅगिंग संदर्भात असलेली नियमावली, विद्यार्थ्यांचे हक्क याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच बैठकीत शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या विविध कार्यक्रमांविषयीचाही आढावा घेतला. याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी डॉ.वैशाली नाईक, हर्षदा डहाके, सर्वेश पाटील, शेख तेहसिन यांच्यासह डॉ.निखील पाटील, प्रा.कल्पना बाचेवार, शैली पारेख उपस्थीत होते.