<
(येत्या ३ दिवसात येथील दारुड्या ग्रामसेवकाची बदली करुन नविन निर्व्यसनी ग्रामसेवक यांची नियुक्ती न झाल्यास येथील ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन व रास्ता रोको करणार असा ईशारा)
जामनेर/ प्रतिनीधी -शांताराम झाल्टे दि.२९’. पहूर येथून जवळच असलेल्या पिंपळगांव कमानी येथील ग्रामपंचायत ला संजय पाटील नावाचे ग्रामसेवक सद्या कार्यरत आहेत.परंतु ते अतिशय दारुडे आहेत.ग्रामपंचायत मधे कधीच येत नाही आणि आलेच तर येताना नेहमीच फूल दारु पिऊन येत असतात ते पण महिन्यातील १ दिवस.
ग्रामपंचायत च्या सरपंच या महिला असून या दारुड्या ग्रामसेवक शी काय बोलायचे व विकास कामांविषयी चर्चा काय करावी हेच कळत नाही ते अतिशय दारुडे आहेत.आणि या ग्रामसेवक मुळे गावातील शालेय विद्यार्थी व नागरिकांना कुठलेही दाखले व कागदपत्रे मिळत नसल्याने अतिशय त्रास होत आहे.सद्या पावसाळा असल्याने आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरु झाल्याने या विद्यार्थी व नागरिकांना कागदपत्रे व इतर दाखले घेण्यासाठी अगदी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या ग्रामसेवक च्या बदलीबाबत जामनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी-मा.श्रीमती.कवडदेवी मॕडम यांना गेल्या महिन्यात दि.२९/६/२०२१ रोजी या गावच्या ग्रामपंचायत सरपंचसाहेब-सौ.प्रियंका चव्हाण यांनी पत्रव्यवहार देखील केलेला असून परंतु अद्यापही मा.गटविकास अधिकारी यांनी कुठलीही कार्यवाही केलेली दिसत नसल्याचे कळते.
तरी,येत्या ३ दिवसांत पिंपळगांव कमानी ग्रामपंचायत ला पूर्णवेळ ग्रामसेवक उपलब्ध करुन देण्याची मागणी येथी नागरिक,विद्यार्थी व जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात येत आहे.परंतु,जर येत्या ३ दिवसांत या ग्रामपंचायत ला पूर्णवेळ(विशेषतः निर्व्यसनी) ग्रामसेवक उपलब्ध न झाल्यास येथील सरपंच-सौ.प्रियंका चव्हाण,जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,सचिव-विठ्ठलभाऊ !चव्हाण,संचालक-विकासभाऊ चव्हाण,ग्रामपंचायत सदस्या-सौ.सईबाई चव्हाण,संस्थेच्या संचालिका तथा ग्रा.पं.सदस्या-अनुसया चव्हाण,ग्रा.पं.सदस्य-कैलासभाऊ चव्हाण,मा.ग्रा.पं.सदस्य-योगेशभाऊ राठोड,प्रल्हादभाऊ चव्हाण,संस्थेचे संचालक-गणेशभाऊ राठोड,प्रविण चव्हाण,तुकाराम चव्हाण,संदिप राठोड,बबलू राठोड,लाला राठोड,यांंच्यासह असंख्य नागरिकांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करुन रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.