Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“आम्हालाही शिकायचे आहे” उपक्रमांतर्गत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/07/2021
in शैक्षणिक, सामाजिक
Reading Time: 1 min read
“आम्हालाही शिकायचे आहे” उपक्रमांतर्गत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप

जळगाव (प्रतिनिधी) – केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे नववी ते बारावीच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम हरिविठ्ठल नगर व मांगीलाल बाफना नेत्रपेढी, आचार्य भवन नवी पेठ येथे झाला. प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक क्षेत्रातील विशेष मार्गदर्शन वर्ग हा प्रकल्प गेल्या १७ वर्षांपासून कार्यरत आहे.

या प्रकल्पाचे माध्यमातूनच इयत्ता पाचवी ते आठवीच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्ग घेतले जातात ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शालेय पाठ्यपुस्तके घेता येत नाही अशा इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके “आम्हालाही शिकायचे आहे” या उपक्रमांतर्गत पाठ्यपुस्तक सहयोग योजना गेल्या ७ वर्षापासून राबविण्यात येत आहे.

आज हरिविठ्ठल नगर, खंडेराव नगर, राजीव गांधी नगर, शनिपेठ, कांचन नगर, चौघुले प्लॉट या भागातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून भुलरोग तद्न्य डॉ. सोनाली महाजन, बळवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक संजय कासार, संचालिका संगीता नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी जयदिप शहा, हरी विठ्ठल नगर येथील मारुती मंदिराचे विश्वस्त लालचंद भिल यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. सोनाली महाजन यांनी समायोचित भाषणात विद्यार्थ्यांना जिवनात मोठे होऊन यशस्वी होण्याचा मार्ग सांगितला तसेच आत्तापासूनच आपल्या अभ्यासाची ध्येय निश्चित करणे आवश्यक असल्याचे सांगत केशवस्मृती प्रतिष्ठानने गरिब, गरजु मुलांना सहकार्याची जी भावना निर्माण केली आहे ती कौतुकास्पद असल्याचे सांगितले. सौ सविता नाईक यांनी स्वयं-अध्ययन कसे करावे असे सांगितले. या उपक्रमासाठी बळवंत नागरी सहकारी पतसंस्था यांचे आर्थिक सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशवस्मृतीचे प्रशासकीय अधिकारी सागर येवले यांनी केले तर यशस्वितेसाठी राजश्री डोल्हारे, स्नेहा तायडे, किशोर गवळी, परेश शिकरवार, गोपाळ तगडपल्लेवार, राधिका गरुड, ज्योती बारी, मंगला अहिरे यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

दानिश देशमुख इंजिनियर कृती समितीच्या धरणगाव तालुका सचिव पदी निवड

Next Post

ईनरव्हिल क्लब आँफ जळगाव यांनी म.रा.म.पत्रकार संघाच्या माध्यमातून दिला कोकणातील पुरग्रस्तांना मदतीचा हात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d