<
जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे शेतकऱ्यांचे कैवारी,शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते आ- स्व:गणपतराव देशमुख यांना जामनेर तालुका रयत शेतकरी संघटनेच्या वतीने पत्रकार कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सांगोला(जि-कोल्हापूर) या विधानसभा मतदार संघातुन 1962 साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या नंतर तब्बल 11 वेळा एकाच मतदार संघातुन निवडून येण्याचा बहुमान मिळालेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत होते.त्यांनी तब्बल 60 वर्षे पत्रकारिता देखील केली आहे,तसेच70 वर्षे ते राजकारणात सक्रिय होते.आ- स्व:गणपतराव देशमुख यांना नेहमीच शेतकऱ्यांचा कळवळा असायचा.शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी ते सदैव अथक प्रयत्न करत असत.आ-स्व: गणपतराव देशमुख यांनी सलग 11 वेळा निवडून आल्या नंतर देखील आपल्या राहणीमानात कुठलाही बदल केला नाही.”साधी राहणी उच्च विचार सरणी”या उक्तीप्रमाणे त्यांची जीवनशैली संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत होती. वयाच्या95 व्या.वर्षी या लोकनेत्यानी अखेरचा श्वास घेतला.शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटणाऱ्या या जेष्ठ नेत्याच्या तसेच या शेतकऱ्यांच्या लाडक्या नेतृत्वाची अचानक “एक्झिट”झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांत शोककळा पसरली आहे. शेतकऱ्यांचे कैवारी असलेल्या या जेष्ठ नेत्याला आज जामनेर तालुका रयत शेतकरी संघटनेच्या वतीने भुसावळ रोडवरील पत्रकार कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हा सहसचिव-सुनिल इंगळे उपस्थित होते.त्यांच्या हस्ते शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते,माजी मंत्री,आ-स्व:गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तसेच यावेळी उपस्थित रयत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष-शांताराम झाल्टे,तालुका उपाध्यक्ष-अनिल शिरसाठ, युवा तालुका अध्यक्ष-निवृत्ती पाटील,उपाध्यक्ष-नितीन इंगळे,यासह पत्रकार-दादाराव वाघ,मिनाताई शिंदे,साहेबराव साळुंखे यासह अन्य पत्रकार बांधव यांनी देखील आ- स्व:गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली.