<
अमळनेर : तालुक्यातील चौबारी गावात सुमारे २०० जणांना कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीकरण करण्यात आले.
५ ऑगस्ट रोजी झालेल्या लसीकरणाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पोटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य पाटील आणि त्यांची टीम आरोग्य सेविका कल्पना बडगुजर, आरोग्य सेवक दीपक पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. निलेश सोनवणे, गट प्रवर्तक आशा पाटील, अंगणवाडी सेविका निर्मला पाटील, आशा सेविका भारती पाटील व मीना पाटील यांच्या मार्फत सदर लसीकरण करण्यात आले. यावेळी डॉ. दीपक पाटील यांनी कोरोना आजाराबाबत जनजागृती करून लसीकरणाचे महत्त्व विशद केले.
कोरोना आजाराचे गांभीर्य लक्षात घेता चौबारी गावात लसीकरण व्हावे यासाठी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पोटोळे आणि मारवड प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य पाटील यांना सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मोरे यांनी विनंती केली असता गावात लसीकरणाचे नियोजन करण्यात आले. भविष्यात टप्याटप्याने गाव १०० टक्के लसीकरण करण्याचा मानस रवींद्र मोरे यांचा आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र मारवडने लसीकरण शिबीर आयोजित केल्याने लाभार्थींनी आनंद व्यक्त केला.