<
जळगांव(प्रतिनिधी)- शिक्षण विभागाचा वतीने एक नियमावली चे परिपत्रक एप्रिल महिन्यात व २४/०७/२०२१ रोजी काढण्यात आले होते. तरी देखील काही खासगी शाळेची त्याच प्रकारे आपली मनमानी कारभार चालवत आहे.
त्यामुळे पालकांनी आपली अडचण महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन कडे सांगितली त्यावर कारवाही करत आम्ही मा.शिक्षण अधिकारी यांची भेट घेतली होती व त्यांना हा सर्व प्रकार कळवला तसेच आम्ही पालकांच्या म्हणण्यानुसार संबंधित काही शाळेची भेट घेतली.
त्यात ओरीयन इंग्लिश मीडियम स्कूल येथे गेले असता हा सर्व प्रकाराचा जाब विचारला, तरी त्यांनी आम्हाला इतकेच सांगितले की जो पर्यंत पालक काही प्रमाणात फीस भरत नाही तो पर्यंत आम्ही त्या विद्यार्थ्यांना त्या ऑनलाइन शाळेत दाखल करणार नाही. ह्या वर आज मासू ने जिल्हापरिषद शिक्षण विभाग सभापती रवींद्र पाटील (छोटू भाऊ) व उप-शिक्षण अधिकारी, यांना तक्रार देण्यात आले. आज त्या विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची परीक्षा असून त्यांना त्या पासून शाळे ने वंचित ठेवले आहे त्यांना परीक्षेला सुद्धा बसू दिले नाही आहे आणि या प्रकारचा आम्ही निषेध व्यक्त करून आम्ही उप शिक्षण अधिकारी सपकाळे सर यांच्या दालनात सर्व पालक त्यांचे पाल्य व मासुचे विभाग प्रमुख ऍड.अभिजीत रंधे आणि संपूर्ण मासू च्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. तेव्हा उप शिक्षण अधिकारी सपकाळे साहेब यांनी सर्व मासूची व पालकांची बाजू ऐकल्यावर तात्काळ शाळेच्या अधिकारी सर यांना फोन करून चौकशी केली.
तक्रार अर्जात मागणी ती खलील प्रमाणे…
1.शिक्षणा पासून वंचित विद्यार्थ्यांना 2 दिवसात त्या ऑनलाइन शाळेत दाखल करण्यात यावे.
2.या विद्यार्थ्यांची 5/8/2021 म्हणजे आज पासून पहिल्या सत्राची परीक्षा आहे. तर त्यांचे जे शैक्षणिक नुकसान झालं आहे त्याची शाळा कोणत्या स्वरूपात भरपाही करणार आहे याचा खुलासा द्यावा.
3.आपल्या परिपत्रकात शाळेची परवानगी रद्द करण्याचे जे आदेश आपण काढले होते त्याची कारवाही करण्यात यावी.
4.या खासगी शाळे वर जर 2 दिवसात कारवाही न केल्यास व विद्यार्थ्यांना व पालकांना न्याय न मिळाल्यास आपल्या कार्यालयात आमरण उपोषण करण्यात येईल किंवा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. आणि याचे सर्वस्व जवाबदारी आपली व प्रशासनाची व सरकारची असेल ह्या वेळी मासू चे पदाधिकारी अँड अभिजित जितेंद्र रंधे खानदेश विभाग प्रमुख, चेतन चौधरी विभाग सचिव, रोहन युवराज महाजन जिल्हाअध्यक्ष, संतोष लक्ष्मण भंगाळे, ललित पाटील, योगेश्वर गुजर, सतीश बिऱ्हाडे, वैभव चौधरी हे उपस्थित होते.