<
श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचालित इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मधील बी. फार्मसी अभ्यासक्रमाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड लोणेरे यांनी निकाल जाहीर केला आहे. प्रथम बी. फार्मसी वर्षातील (प्रथम सत्र ) एस.एस.बी.टी.महाविद्यालयाचा एकूण 100% निकाल लागला असून कु. आयुष देवेंद्र कुमार ह्याने CGPA नुसार (९.८६%) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर कु. प्रियांशी मंगेश बुंदे (९.८५%) द्वितीय, कु. कोमल प्रवीण ढाके (९.७८%) तृतीय, कु. प्रतिक रामचंद्र चौधरी (९.७४%) चौथा , कु .भूपेंद्र नवाल मगरे आणि कु .अमृतेश सुनील जोशी ह्याने (९.५९%) गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अमोल लांडगे यांनी दिली.
एस एस बी टी महाविद्यालयाचे प्रशासन, शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देत असतात. महाविद्यालयाची प्रशस्त इमारत असून अद्यावत सामुग्री असलेल्या प्रयोगशाळा आहेत विविध जरनल, मासिके व सर्व विषयाची पुस्तकाने सुसज्य असे ग्रंथालय आहे. विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. बाहेर गावच्या मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र व सर्व सोई सुविधा असलेले वसतिगृह आहे. महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षणासाठी एक खास डिजिटल क्लासरूम तयार केले असून या क्लासरूम मध्ये सर्व अद्यावत उपकरणे आहेत
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिक विकास साधण्यासाठी महाविद्यालय फार्मसी क्षेत्रातील तज्ञ यांचे मार्गदर्शक वर्ग, व्यक्तिमत्वविकास शिबीर, हॉस्पिटल व्हिजिट, इंडस्ट्रिअल व्हिजिट, ब्लडबँकव्हिजिट, स्नेहसंमेलन, विविध सामाजिक कार्यक्रम, क्रीडास्पर्धा आयोजित करत असते.
एसएसबीटी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे त्यांचा नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त आ. रावसाहेब शेखावत, डॉ के.एस. वाणी, डॉ एस.पी. शेखावत व प्राचार्य डॉ अमोल लांडगे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.