<
एसएसबीटी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय बांभोरी जळगाव येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के एस वाणी यांच्या जीवनावर आधारित “ऋणानुबंध” या पुस्तकाचे माननीय श्री रावसाहेबजी शेखावत यांच्या हस्ते प्रकाशन
एस एस बी टी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के एस वाणी ह्या व्यासंगी व्यक्तिमत्त्वाच्या जीवनावर आधारित ” ऋणानुबंध” या पुस्तकाचे श्री. रावसाहेब शेखावत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या पुस्तकाचे लेखक प्राचार्य डॉ. बापूराव देसाई आहेत. त्यांचे आतापर्यंत एकूण 150 ग्रंथ प्रकाशित आहेत त्यामध्ये अहिराणी, मराठी, हिंदी तसेच अन्य भाषांमध्ये विविध अनुवाद यांचा समावेश आहे.
डॉक्टर बापूराव देसाई यांना साहित्यश्री, साहित्यभूषण,खानदेशरत्न, साहित्य वारीधि या उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे.
प्राचार्य के. एस वाणी सर यांच्या शैक्षणिक कार्यातील अनमोल योगदाना ने लेखकाला या पुस्तकाची प्रेरणा दिली या पुस्तकात वाणी सरांच्या बालपणापासून ते प्राचार्य पदापर्यंत चा प्रवास अत्यंत सुमधुर अशा शब्दात वर्णन करण्यात आलेला आहे.
या पुस्तकाच्या उद्घाटन प्रसंगी माननीय रावसाहेब जी शेखावत डॉक्टर केस वाणी लेखक डॉक्टर बापूसाहेब देसाई, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस पी शेखावत, श्री एस बी पवार डॉ. आय डी पाटील हे उपस्थित होते पुस्तकाच्या उद्घाटन प्रसंगी श्री रावसाहेब जी शेखावत यांनी श्री के एस वाणी यांच्या कार्याला उजाळा दिला आतापर्यंत शैक्षणिक कार्यामध्ये केलेल्या भरीव कामगिरी साठी त्यांचे कौतुक केले. आपले जीवन हे इतरांसाठी दीपस्तंभासारखे ठरले पाहिजे आणि श्री वाणी सरांचे जीवन चरित्र हे त्याचे उत्तम उदाहरण आहे असे त्यांनी नमूद केले.
डॉ . के एस वाणी यांनी ” जीवनात बरच असे प्रसंग येतात जिथे सर्व मार्ग बंद झाले असतात पण त्यावेळेस आपली विवेकशक्ती जागृत ठेवून सन्मार्गाने सतत वाटचाल करत राहणे हेच जीवनाचे खरे सार आहे.” असे नमूद केले.
महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वाणी सरांना जीवनात अनेक शैक्षणिक शिखरे पादाक्रांत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.